ग्राम सुरक्षा यंत्रणा मीटिंग साठी सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी
उपस्थित राहण्याचे सपोनि अक्षय सोनवणे यांचे मानवासियांना आवाहन

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधील, दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामस्थांना दहिवडी पोलीस स्टेशन दहिवडी यांचेकडून कळविण्यात आले आहे की, माननीय पोलीस अधीक्षक सो सातारा व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, यांचे आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील मालमत्ते संदर्भात व शरीराविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणे करीता सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रभावी रित्या ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी,दरोडा,आग, जळीताच्या घटना, लहान मुले हरवणे, शेतातील पिकांची चोरी,गंभीर अपघात, वन्य प्राणी हल्ला,पूर,भूकंप इत्यादी घटनांमध्ये सर्व गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलास ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे मोठी मदत होत आहे. तसेच जिल्हा प्रशासनास माहिती प्रशासनाचे काम जलद गतीने करण्यास ग्रामसुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत,संकटात स्वतःचे मोबाईल वरून सर्व गावकऱ्यांना एकाच वेळी सूचना देणे, सावध करणे यासाठी उपयुक्त ग्राम सुरक्षा यंत्रणा संकटकाळी घाबरू नका, ग्रामसुरक्षा यंत्रणेला फोन करा, संकटकाळी मदतीला जा याबाबत सर्वांना या यंत्रणेचा उपयोग व्हावा व त्वरित मदत मिळावी या उद्देशाने व सदरची ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी व त्याबाबत माहिती देणे करता सोमवार दिनांक १७/२/२०२५ रोजी सकाळी १०. ०० वाजता बालाजी मंगल कार्यालय गोंदवले रोड दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या ठिकाणी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नगरपंचायत,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गावातील प्रमुख मंडळी, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व ग्रामसेवक, सर्व तलाठी, सर्व पोलीस पाटील, पत्रकार बंधू-भगिनी यांचे करिता मिटींगचे आयोजन केलेले आहे.
तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे विनम्र आवाहन दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे यांनी केले आहे.