जिल्हा
Trending

दहिवडी व गोंदवले शहराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता पुलाच्या कामासाठी दि.१३ जानेवारी पासून बंद ! या पर्यायी मार्गाने होणार वाहतूक…

वृत्त दि. – सोमवार,१२ जानेवारी २०२५

वृत्त – माण,सातारा.


     माण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात, सध्या रस्त्यांची दुरुस्ती व विस्तारीकरणाची कामे होत असताना पाहायला मिळत आहेत.यास अनुसरून दहिवडी व गोंदवले बु. या शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या दहिवडी ते गोंदवले बु. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


      या रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी यांचेमार्फत पुलाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. या कामामुळे मंगळवार दि.१३ जानेवारी ते ३१ जानेवारी यादरम्यान हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी व जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांनी घेतला आहे.


     पुलावरून कॉंक्रिटीकरणाच्या कामाच्यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठीदहिवडी बाजुकडुन गोंदवले बु. कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पर्यायी मार्गाची उपलब्धता असल्याने सदर मार्गावरील वाहतुक वळविणे आवश्यक आहे. त्याबाबतची अधिसुचना जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे.


       याविषयी अधिक माहिती अशी की, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दहिवडी ते गोंदवले बु// या मार्गावरील पुलाच्या रस्त्याचे क्राँक्रेटीकरणाचे काम पुर्ण होईपर्यंत सदर मार्गावरील जाणारी व येणारी वाहतुकीत बदल करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत राहणेकरीता मंगळवार दि. १३/०१/२०२६ चे ००.०१ ते सोमवार ३१/०१/२०२६ चे २३.५९ वा. पर्यंत खालीलप्रमाणे अधिसुचना पारित केली आहे.


वाहतुक मार्गातील बदलाबाबत वाहतुक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करण्यात आला आहे.

१. दहिवडी बाजुकडुन गोंदवले बु// बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही मायणी चौक दहिवडी येथुन खांडसरी चौक मार्गे गोंदवले बु// अशी जाईल.

२. म्हसवड, गोंदवले बु// बाजुकडुन दहिवडी कडे जाणारी वाहतुक ही गोंदवले बु// येथील आप्पा महाराज चौकातुन पंढरपुर ते सातारा मार्गाने खांडसरी चौक मार्गे दहिवडी कडे जाईल.

३. दहिवडी येथुन गोंदवले बु// या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक पूर्णतः बंद राहील.



       तरी वरील वाहतुक ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे असे विनम्र आवाहन दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि दत्तात्रय दराडे यांनी केले आहे.

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.