क्राईम
Trending

दहिवडीत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; तिघांवर गुन्हे दाखल

वृत्त दि- १३/०८/२६

वृत्त – दहिवडी, ता.माण,जि.सातारा.


    अपघातांचे तसेच अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने दहिवडी पोलीस ठाणे व महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने दहिवडी शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दोघांवर मोटार वाहन कायद्यानुसार, तर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गैरशिस्तीचे वर्तन करणाऱ्या एकावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष मोहिमेंतर्गत विनानंबर प्लेट वाहने, ट्रिपल सीट, विनासिटबेल्ट वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर, बेशिस्तपणे वाहन चालविणे तसेच विमा व पीयूसी नसलेल्या वाहनांवरही कारवाई केली जात आहे.

     १३ ऑगस्ट रोजी दहिवडी शहरात करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान अंकुश रामू काकडे (वय ५९, रा. शिंदी बु., ता. माण, जि. सातारा) आणि दिपक शंकर शिंदे (वय २८, रा. झरगरवाडी, ता. बारामती, जि. पुणे) हे मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यानुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


तसेच सुभाष प्रकाश पोळ (वय २८, रा. वरकुटे-मलवडी, ता. माण, जि. सातारा) हा दहिवडी एसटी स्टँड परिसरात मद्यप्राशन करून गैरशिस्तीचे वर्तन करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी  विभाग कॅम्प वडूज यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भाऊसाहेब गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव साबळे, सागर लोखंडे, महामार्ग वाहतूक  पोलीस केंद्र कराड चे हवालदार विजय घोलप, शशिकांत देशमुख, पोलीस नाईक विक्रम हसबे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज शिंदे, अनिल चव्हाण या सर्वांच्या मदतीने करण्यात आली.



 

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.