ताज्या घडामोडी
Trending

श्री.लोणारबाबा देवस्थानच्या विकासासाठी अखेर ३ कोटींची प्रशासकीय मान्यता; मंत्री जयकुमार गोरे यांची आश्वासनपूर्ती

वृत्त – बिदाल,ता.माण,जि.सातारा.

वृत्त दि.- १६ सप्टेंबर २०२६


     माण तालुक्यातील बिदाल येथील प्रसिद्ध श्री लोणारबाबा देवस्थानच्या विकासकामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातून ही माहिती समोर आली आहे.


    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत श्री.लोणारबाबा देवस्थान, मौजे बिदाल, ता. माण, जि. सातारा येथे विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.


       शासन निर्णयानुसार, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित निधीतून एकूण ३ कोटी रुपये या रकमेतील विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या प्रस्तावावर ग्रामविकास विभागाच्या राज्य निकष समितीच्या दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत विचार करण्यात आला. यात्रास्थळावरील प्रस्तावित विकासकामांची अंदाजपत्रके व संबंधित कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर समितीने विकासकामांसाठी निधीची शिफारस केली होती. त्यानुसार शासनाने ही प्रशासकीय मान्यता दिली आहे.


     ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांचा बिदाल येथील लोणारबाबा देवस्थानशी विशेष संबंध असून, मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर देवस्थानच्या प्रांगणात बिदाल गटातील नागरिकांच्या वतीने झालेल्या भव्य नागरी सत्काराच्या वेळी देवस्थानच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले होते.


त्या पार्श्वभूमीवर आता शासनाकडून ३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाल्याने देवस्थानच्या विकासाला चालना मिळणार आहे.


   शासन निर्णयातील या मंजुरीमुळे लोणारबाबा देवस्थान परिसरातील प्रस्तावित विकासकामांना प्रशासकीय आधार मिळाला असून, पुढील कार्यवाहीकडे भाविक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.