राजकीय
Trending

मंत्री जयकुमार गोरे यांचा रविवार दि.९ ऑगस्ट रोजीचा बोराटवाडी येथील ‘जनता दरबार’ रद्द; नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

वृत्त – माण, सातारा.

वृत्त दि.- ९ ऑगस्ट २०२६


     महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार दि.९ ऑगस्ट रोजी; सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे हे त्यांच्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांचा रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी ‘कमलकुंज’ निवासस्थान, बोराटवाडी,ता.माण,जि.सातारा येथे आयोजित करण्यात आलेला ‘जनता दरबार’ रद्द करण्यात आला आहे.


    या विशेष दौऱ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, या जनता दरबाराची पुढील तारीख, वार आणि वेळ लवकरच जाहीर केली जाईल, असे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून कळविण्यात आले आहे.


   नागरिकांना काही अतिमहत्त्वाचे काम किंवा अडचण असल्यास त्यांनी दहिवडी येथील जनसंपर्क कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा ०२१६५२२०५९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी व सहकार्य करावे ही विनंती.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.