ताज्या घडामोडी
दहिवडी पोलिसांच्या पुढाकाराने ‘हर घर तिरंगा’ रॅली उत्साहात
वृत्त दि. – १३/०८/२६
वृत्त – दहिवडी, ता.माण,जि.सातारा.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) दहिवडी शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२.१५ ते १.०५ या वेळेत झालेल्या या रॅलीत दहिवडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच महात्मा गांधी विद्यालय, दहिवडीचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
दहिवडी पोलीस स्टेशनपासून सुरू झालेली रॅली छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, संविधान चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाजार पटांगण इथून पुन्हा संविधान चौक, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मार्गे एस.टी. स्टँड, दहिवडी येथे पोहोचली. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थी व पोलिसांनी देशभक्तीपर वातावरणात रॅलीत सहभाग नोंदविला.
रॅलीनंतर सहभागी विद्यार्थ्यांना दहिवडी पोलीस ठाण्याच्या कामकाजाची सर्वसाधारण माहिती देण्यात आली. तसेच पोलीस ठाण्यातील शस्त्रांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन पोलीस ठाणे परिसराची पाहणी करून देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.

