राजकीय

मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दहिवडीत ७ कोटी ७६ लाख रुपयांच्या विकास कामांचे रविवारी होणार भूमिपूजन…

वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा


     ग्राम विकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्ह्यातील; माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरासाठी, शासनाच्या विविध योजनांतून एकूण ७ कोटी ७६ लाख रुपयांच्या विकास कामांचा भरीव निधी उपलब्ध झाला असून या विकास कामांचे भूमिपूजन रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.अशी माहिती दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा निलम अतुल जाधव यांनी दिली आहे.



   याविषयी अधिक माहिती अशी की, प्रभाग क्र.१ मध्ये अतुल शिंदे वस्ती ते पानमळा रस्ता डांबरीकरण करणे, प्र.क्र.२ मध्ये फलटण रोड ते खताळ वस्ती रस्ता कॉंक्रीट करणे, प्र.क्र.३ मध्ये शिवाजीनगर गटर बांधकाम करणे, प्र.क्र.६ मध्ये अंतर्गत रस्ता करणे, प्र.क्र.१७ मध्ये गोंदवले रोड ते अतुल जाधव ते कॅनाल बंधिस्त गटर करणे,प्र.क्र.८ मध्ये अशोक टिकोळे घर ते जैन मंदिर ते आबा महाजन कॉंक्रीट गटर करणे, प्र. क्र.४ मध्ये आंबेमळा ते खाशाबा जाधव वस्ती कॉंक्रीट रस्ता व साकव करणे, प्र.क्र.१२ मध्ये सुरेश तुपे घर ते कोळेकर वस्ती रस्ता डांबरी करणे,



प्र.क्र.१७ मध्ये वरचा रानमळा अंतर्गत बंधिस्त गटर करणे, प्र.क्र.९ मध्ये अंतर्गत कॉंक्रीट रस्ते,गटर,व पेव्हर ब्लॉक करणे, प्र.क्र.२ मध्ये शिंगणापूर रोड ते बबन सावंत घरापर्यंत रस्ता कॉंक्रीट करणे, प्र.क्र.१७ मध्ये गोंदवले रोड ते एच.पी.पंप पाठीमागील रस्ता डांबरीकरण करणे, प्र.क्र.४ मध्ये जाधव वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रीट करणे, प्र.क्र.१ मध्ये जगदीश शिंदे घर ते कोकरे वस्ती रस्ता डांबरी करणे, प्र.क्र.६ मध्ये सरकारी दवाखाना ते डॉ.काशीद घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्र.क्र.१२ मध्ये कोळेकर वस्ती ते शिंदे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे, दहिवडी नगरपंचायत अंतर्गत विकास सोसायटी शेजारी सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, दहिवडी नगरपंचायत अंतर्गत नगरपंचायत मालकीच्या जागेत सार्वजनिक मुतारी बांधकाम करणे, दहिवडी नगरपंचायत हद्दीतील न.प.जागेत सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, दहिवडी नगरपंचायत अंतर्गत विकास नगर येथे सामुदायिक शौचालय बांधकाम करणे, दहिवडी नगरपंचायत अंतर्गत सामुदायिक शौचालय दुरुस्ती करणे, लिंगायत समाज स्मशानभूमि कंपाउंड करणे, प्र.क्र.६ मध्ये अंतर्गत गटर बांधने, सिद्धनाथ मंदिर ते फलटण रोड कॉंक्रीट करणे,दहिवडी शिंगणापूर जुना पुलासह रस्ता (दत्त मंदिर जवळ) रस्ता कॉंक्रीट करणे, दहिवडी रानमळा (वरचा) रस्ता डांबरीकरण करणे, प्र.क्र.१७ मध्ये मायणी रोड मोरे मळा ते काटकर वस्ती,साळुंखे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे.या सर्व विकासकामांचे भूमिपूजन रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात होत आहे.


     दहिवडी शहरात होत असलेल्या विकास कामांमुळे जनतेत समाधानाचे,आनंदाचे व उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले आहे. या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी सर्व प्रभागांतील नगरसेवक,नगरसेविकांसह परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच सुजान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे विनम्र आवाहन उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले व मुख्याधिकारी संदीप घार्गे यांनी केले आहे.

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.