क्राईमक्रीडा व मनोरंजनजिल्हाताज्या घडामोडीसामाजिक
Trending
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दहिवडी शहरात पोलिसांचा रूट मार्च !
वृत्त दि.- मंगळवार१८ फेब्रुवारी २०२४
वृत्त – दहिवडी, ता.माण,जि.सातारा
शिवजयंती उत्सवाची तयारी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात सुरू आहे. या पार्श्वभूमीला अनुसरून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. शिवजयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत.
दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील संमिश्र लोक वस्तीमध्ये आज मंगळवार दि.१८ फेब्रुवारी सायंकाळी ५ : ४५ ते ६:१५ या वेळेमध्ये शिवजयंती अनुषंगाने दहिवडी पोलीस स्टेशन यांचेकडून रूट मार्च काढण्यात आला. हा रुट मार्च दहिवडी पोलीस स्टेशन ते एसटी स्टँड चौक या मार्गाने पुढे बिदाल चौक ते फलटण चौक, मायणी चौक, बाजार पटांगण ते सिद्धनाथ मंदिर कॉर्नर पर्यंत व परत याच मार्गाने पुन्हा बाजारपेठेतून दहिवडी पोलीस स्टेशन असा रूट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च काढण्याकरता दहिवडी पोलीस स्टेशन कडील २ अधिकारी,२२ अंमलदार आणि १९ होमगार्ड हजर होते.
हा रूट मार्च दहिवडी पोलीस स्टेशन चे सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.




