वृत्त – दहिवडी, या.माण,जि. सातारा.
वृत्त दि. – बुधवार,१९ फेब्रुवारी २०२५
आरंभ पालक मेळावा हा बालविकासाचे महत्त्व समाजात पोहोचवण्यासाठी आयोजित केला जातो, याद्वारे पालकांना बालसंगोपनाच्या विविध घटकांबाबत माहिती दिली जाते आणि पालक व बालसंगोपनाच्या सेवकांमध्ये चर्चा होते.

या पार्श्वभूमीला अनुसरून; महाराष्ट्र शासन बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पूर्व प्रकल्प यांचे कडून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील, दहिवडी बीट मार्फत उद्या गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी दहिवडी नगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ मंदिर व परिसर, या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामधून पालकांना बालसंगोपनाच्या विविध घटकांबाबत माहिती मिळते, पालक आणि बालसंगोपनाच्या सेवकांमध्ये चर्चा होते,पालकांना त्यांच्या मुलांसह घरी चांगले संवाद करण्यास प्रोत्साहित केले जाते, बालसंगोपनात त्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा होते,समुदायातील प्रत्येक घटकांपर्यंत बालविकासाचे महत्त्व आणि संदेश पोहोचवला जातो. तसेच या पालक आरंभ मेळाव्यात गरोदर माता,स्तनदा माता व १ ते ३ वर्षाच्या बालकांना द्यावयाचा सकस आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात येते.

हा पालक आरंभ मेळावा म्हणजे बालविकासाचे महत्त्व आणि संदेश पोहोचवण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून काम करते.
अशी माहिती नागरी सातारा पूर्व प्रकल्प पर्यवेक्षिका हेमलता मोरे यांनी दिली आहे तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस दहिवडी यांनी दिली आहे.या पालक मेळाव्यासाठी दहिवडी व दहिवडी पंचक्रोशीतील सर्व बालचमुंसह माता,पालक तसेच पंचक्रोशीतील सुजाण नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
