क्राईमजिल्हाप्रशासकीयसामाजिक
Trending

सपोनि अक्षय सोनवणे यांची म्हसवड पोलीस स्टेशन येथे बदली ! दहिवडी व पंचक्रोशीवासियांचे मानले आभार…

लेखन प्रकार – मनोगत                                          बुधवार,२७ फेब्रुवारी  २०२५

लेखक – सपोनि अक्षय सोनवणे

           ‌‌  म्ह‌सवड पोलीस स्टेशन.


सर्वांना सप्रेम नमस्कार..


         सर्व नागरिकांना कळविण्यात येते की माझी दहिवडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते म्हसवड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अशी बदली झालेली आहे. बदली हा सर्व प्रशासकीय खात्यांचा एक भाग आहे. दहिवडी वासियांकडुन खुप काही शिकायला मिळाले. गोरगरीबांची, अडले-नडलेल्या लोकांची कामे झाल्यानंतर त्यांच्या चेह-यावरील समाधान पाहुन मला जो आनंद व्हायचा त्यातुन मला पुढील कामे करण्यासाठी खुप खुप पाठबळ व शक्ती मिळायची. त्यातुन मी प्रामाणिकपणे काम करुन न्याय देण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केला. मी पोलीस दलाचे प्रामाणिकपणे काम करत असताना काही लोकांची कामे झाले नसतील त्यातुन काही नागरीक नाराज झाले असतील. परंतु जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरीकांची कामे मी अन्याय न करता लवकरात लवकर करुन दिली…त्याचा मला अभिमान आहे. विशेष म्हणजे दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील सर्वसामान्य नागरिक, अनाथ, निराधार, वृध्द यांचे प्रश्न सोडवणे ही सर्व कामे करताना आपली सर्वांची भक्कम साथ,पाठबळ व आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी सर्वांना सहकार्य करु शकलो.


      मी ही एक माणुस आहे… नोकरी काळात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील,काही लोक दुखावले गेले असतील.. पण त्यात माझा कोणताही वाईट हेतू नव्हता… तो एक कामाचा भाग आहे… अशाही लोकांनी माझ्यावर खुप भरभरुन प्रेम केले व भक्कम साथ दिली…त्यांचे सुध्दा खुप खुप आभार….!!!



         मी दहिवडी पोलीस ठाणे येथे रुजु झाल्यापासुन दहिवडी पोलीस ठाणे कडील अधिकारी व सर्व पोलिस अंमलदार या सर्वांनी मला कामात खुप मोलाची साथ दिल्यामुळेच मी आपली सर्व कामे यशस्वी करु शकलो….जुना सर्व स्टाफ…अन आज जाताना असलेला स्टाफ या सर्वांचे मनापासुन खुप खुप आभार…..!!!


      माण तालुक्यातील दहिवडी पोलीस ठाणे येथील सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवीताना ज्यांचा महत्वाचा वाटा असतो असे माझे पत्रकार बांधव ,सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व व्यापारी यांनी सुध्दा माझ्या कार्यकाळात खुप मोलाची साथ दिली…त्यांचेमुळेच मला लोकांच्या अडीअडचणी जास्त कळाल्या. म्हणुन आपणां सर्वांचा सुध्दा खुप खुप आभारी आहे.


       माण तालुक्याच्या विविध राजकिय पक्षांचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विविध संघटनेचे अध्यक्ष, विविध पदावर असलेले मान्यवर ह्या वडीलधारी लोकांचे खुप मोलाचे मार्गदर्शन व मोलाची साथ मिळाल्यामुळे मी माझ्या कार्यकाळात सामान्य जनतेची खुप कामे सहजतेने करु शकलो. ह्या सर्वांचा मी खुप खुप आभारी आहे.


      विशेषतः माण तालुक्यातील उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय अधिकारी व स्टाफ,आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व स्टाफ, कृषी विभागाचे सर्व अधिकारी व स्टाफ, नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व स्टाफ,फाॕरेस्ट विभागाचे सर्व अधिकारी व स्टाफ, सर्व डॉक्टर या सर्वांनी माझ्या कामात खुप मोलाची साथ दिली. त्यांचे काम मी कधीच विसरु शकत नाही. ह्या सर्वांचे मनापासुन खुप खुप आभार….!!!


        दहिवडी आणि वडूज कोर्ट मधील अधिकारी, सर्व स्टाफ व सर्व ऍडव्होकेट मित्र यांनी सुध्दा माझ्या कार्यकाळात कामात खुप खुप साथ दिली…त्यांचे सुध्दा खुप खुप आभार….!!!


       तसेच माझे पोलीस विभागातील वरिष्ठ मा.पोलीस अधीक्षक सो, मा.अपर पोलीस अधीक्षक सो , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो यांनी सर्वांनी मला वेळोवेळी काम अधिक चांगलेपणाने करण्यासाठी मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.


 


     माझे पद कोणतेही असले तरी सामान्य कुटुबांत जन्मलो असल्यामुळे ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव होती आणि त्या खऱ्या अर्थाने सोडविण्यास सर्वांची मदत झाली. काम करत असताना सामान्य जनतेच्या कामाना प्राधान्य देऊन जेवढे शक्य होईल तेवढे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे . दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील कोणत्याही व्यक्तीशी जाती- धर्म अथवा उच्च-नीच अथवा गरीब-श्रीमंत असा दूजाभाव न ठेवता प्रत्येकाला समान वागणूक देवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तालुक्यातील गरीब, अनाथ, निराधार, विधवा, वृध्द, दिव्यांग यांच्या प्रती एक माणुसकीच्या नात्याने आपलं काहीतरी देणं लागतं म्हणू त्यांच्या उन्नतीसाठी शक्य तेवढा प्रयत्न केला आहे.


         विद्यार्थी हे देशाच्या विकासाची भावी पिढी असतात म्हणून त्यांचं व कुटुंबाचं उज्वल भविष्य घडविण्यासाठी शक्य तेवढा प्रयत्न केला आहे


        सदर कालावधीत दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची लोकसभा/ विधानसभा निवडणूक 2024 कालावधीत , तसेच दैनंदिन काम करताना खुप खुप मोलाची साथ लाभली. सर्वांनीच माझेवर खूप भरभरुन प्रेम केले आहे…त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासुन खुप खुप आभार….!!!


        ह्या सर्व प्रवासात मला खुप ज्ञात-अज्ञात मान्यवरांनी मोलाची साथ दिली आहे….चुकुन कोणाचे आभार मानायचे विसरलो तर माफ करावे….परंतु तालुक्यात अशी व्यक्तीच नाही की त्यांनी माझ्या कामात साथ दिली नाही….सर्वांचा खुप खुप आभारी आहे.


   


     जसे आजपर्यंत माझेवर व माझ्या कुटुंबावर आपण प्रेम केले,साथ दिली आशिर्वांद दिले…असेच प्रेम , साथ व आशिर्वाद कायम माझ्यावर, कुटुंबावर व नविन येणा-या अधिका-यांप्रती असु द्या..!!!


     मी जरी बदली झाल्यामुळे दहिवडी पोलीस ठाणे सोडून जात असलो तरी प्रत्येकाकडे माझा मोबाईल क्रमांक आहे. आपणाला कधीही कोणतीही अडचण आल्यास मला आवर्जून कॉल करा अथवा संदेश पाठवा. आपल्या सेवेत सदैव तत्पर असेल… 🙏


जय हिंद…


आपलाच…
अक्षय सोनवणे
सहाय्यक पोलीस निरीक्षक,
म्हसवड पोलीस ठाणे


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.