क्राईमजिल्हाताज्या घडामोडीसामाजिक
Trending

प्रेयसीनेच केला गोंदवल्याच्या युवकाचा ‘घात”!दहिवडी पोलिसांकडून योगेश पवारच्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा…

वृत्त – गोंदवले बु.,ता.माण,जि.सातारा.


      सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक,ता.माण येथून बेपत्ता झालेल्या योगेश पवार या युवकाचा नरवणे ता.माण येथील त्याच्याच प्रेयसीनेच घात केल्याचा प्रकार दहिवडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. संशयितांना पकडणे हे एक मोठे आव्हान असताना दहिवडी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आरोपींना त्याब्यात घेतले.



     याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मंगळवार दि. १८ मार्च रोजी गोंदावले येथील योगेश सुरेश पवार (वय २८) याला नरवणे येथील रोशनी विठ्ठल माने हिने तुला भेटायचे आहे, हातउसने दिलेले पैसे परत देतो,असे सांगून बोलावून घेतले त्यानंतर दोन दिवस तो न परतल्याने योगेशचा भाऊ तेजस पवार यांनी गुरुवार दि २० रोजी योगेश बेपत्ता झाल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानुसार सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या निरीक्षणाखाली योगेश पवार हा कुठे गायब झाला? त्याचे काय बरेवाईट झाले आहे का?




 



याबाबत पोलिसांना सुरुवातीला काही धागेदोरे सापडत नव्हते.मात्र पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेश सर्वात शेवटी माण तालुक्यातील नरवणे येथे गेल्याचे समजले,त्यानुसार नरवणेमध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे योगेशचे रोशनीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली,पोलिसांनी संशयिताच्या घरी जाऊन चौकशी केली असता संशयित तिथे आढळून आली नाही. त्यांनंतर संशयित आरोपी बारामती आणि मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, त्यापैकी प्रथमेश आणि अखिल विश्वकर्मा या दोघांना बारामतीमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर लोखंडी गजाने मारून योगेशचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर उर्वरित संशयितांची नावे पोलिसांच्या समोर आली. संशयितांपैकी रोशनी विठ्ठल माने आणि तिची आई पार्वती विठ्ठल माने या दोघींना मुंबईतून ताब्यात घेतले,त्यांच्याकडे चौकशी केली असता या खून प्रकरणात एकूण सात जण सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.



      पोलीसांच्या ताब्यातील चार जणांकडे पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर योगेशचा कोणत्यातरी धारधार हत्याराने खून केला व नंतर हातपाय बांधून त्याला त्याच्याच स्वीफ्ट गाडीच्या पाठीमागील सीटवर ठेवून नातेपुते (जि. माळशिरस) येथील फडतरी रस्त्यालगत असलेल्या कॅनॉलमध्ये गाडी ढकलून दिल्याची कबुली संशयितांनी दिली.



त्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेनंतर सदर गाडी फडतरीला जाणाऱ्या रोडवरील कॅनॉलच्या ठिकाणी आढळून आली. सदर स्विफ्ट गाडी आणि योगेशचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत योगेश पवार याचा मोठा भाऊ तेजस पवार याने दहिवडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांविरोधात खूनाचा दाखल करण्यात आला. सात पैकी चारजण दहिवडी पोलिसांच्या ताब्यात असून तिघांचा तपास पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.