जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयविशेषसंपादकीयसामाजिक
Trending

लोकसेवेचा वसा घेतलेला लोकाभिमुख नेता : शेखर भाऊ गोरे

वृत्त – सातारा, महाराष्ट्र.

लेखन प्रकार – स्तंभ लेख


      समाजकारणासह, राजकारणात आणि प्रशासनात आपला वेगळा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व माण – खटाव विधानसभा मतदारसंघात लोकसेवेचा अविरत वसा घेतलेला लोकाभिमुख चेहरा म्हणजेच सातारा जिल्हा बँकेचे संचालक, भाजप नेते शेखर गोरे उर्फ शेखर भाऊ गोरे होय. दुष्काळी माण खटाव च्या मातीत माण तालुक्यातील बोराटवाडी गावात सर्वसामान्य रेशन दुकानदाराच्या कुटुंबात जन्म घेऊन असामान्य कामगिरी करण्यात शेखर गोरे हे यशस्वी ठरले आहेत. आपल्या अंगभूत कौशल्याने व सामाजिक जाणिवेतून त्यांनी विविध विषयांना हात घालून ते उपक्रम तडीस नेले आहेत. मुळत: सामाजिक पिंड असल्याने त्यांनी समाजसेवेतून समाज परिवर्तनाचा ध्यास घेतला. त्यांनी जनतेशी थेट संपर्क साधून सुसंवादाचा पूल बांधला.


      शेखर गोरे यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करून समाजसेवेचा वसा वारसा लोकाभिमुख पद्धतीने जपला.शेखर गोरे यांच्या जिव्हाळ्याचे विषय म्हणजे आरोग्य,शिक्षण,रस्ते,महिला सुरक्षा व पाणी. जनतेच्या अडीअडचणी व व्यथा समजावून घेण्यासाठी त्यांनी वेळ दिला.या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले यासाठी त्यांनी शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानची स्थापना केली. या कामात त्यांनी स्वतःला झोकून देऊन विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले.



      शिक्षण हे प्रगतीचे व परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव असल्याने शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये या भावनेतून गेल्या १२ वर्षापासून गरीब कुटुंबातील शालेय तसेच महाविद्यालयीन गरजू विद्यार्थी – विद्यार्थिनींना यथाशक्ती आर्थिक व शिक्षण उपयोगी साहित्यांची मदत करतात.


         माण खटाव तालुक्यांमध्ये  जनतेची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी त्यांनी शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान मार्फत मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील वर्षी ऐन उन्हाळ्यात १०,००० लिटर क्षमतेच्या १२ टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला. यामध्ये यामध्ये मागील वर्षी माण तालुक्यातील ४७ गावे आणि खटाव तालुक्यातील २६ गावांचा समावेश होता. दहिवडी शहरासाठी ६००० लिटर क्षमतेच्या ३ टँकरद्वारे गरजू जनतेला मोफत पाणी वाटप केले.



     माण – खटाव मध्ये मागील काही वर्षांमध्ये झालेल्या पाणी फाउंडेशन च्या कामासाठी स्वखर्चातून जेसीपी , पोकलेन यांसारख्या मशीनरी तसेच त्यांसाठी लागणारे इंधन खर्च यांसाठी अनेक ठिकाणी भरीव मदत केली. याशिवाय अनेक ठिकाणी स्वखर्चातून बोअर मारून त्यायोगाने इतर सर्व आवश्यक खर्च करून लोकांना पाण्याची व्यवस्था करून दिली.


       कोविड काळात अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा, वैद्यकीय उपकरणे व औषधांचे वितरण केले. शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान मार्फत गेली ११ वर्षांपासून २ रुग्णवाहिकांतून गरजू रुग्णांची निशुल्क सेवा केली जाते. सर्व जाती धर्मातील लोकांना अडीअडचणीच्या वेळेला किंवा अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत व्हावी,यासाठी स्वखर्चातून रुग्णवाहिकेतून केलेली जनतेची सेवा यामुळे आतापर्यंत जवळपास ६००० रुग्णांना वेळेत उपचार मिळाला आहे.यापैकी अनेक रुग्णांचे नातेवाईक अशी माहिती देतात, शेखर भाऊंच्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णाचे प्राण वाचले. यामुळे या निशुल्क रुग्णवाहिकेला “माणदेशाची जीवनदायीनी” असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.



   याशिवाय ज्या रुग्णांना आर्थिकदृष्ट्या वैद्यकीय खर्च झेपणारे नसतात असे रुग्ण शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानकडे आल्यास त्यांना यथायोग्य आर्थिक मदतही केली जाते आणि गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, बैलगाडा शर्यत, क्रिकेट तसेच विविध स्पर्धा यांनाही शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान मार्फत आर्थिक मदत ही केली जाते.


       शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींना काही असामाजिक प्रवृत्ती कडून त्रास होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर आणि एखादी महिला,मुलगी त्यांच्या ऑफिसला तक्रार घेऊन आल्यास रोड रोमिओ,टवाळखोरांना पहिले समजून सांगितले जाते,अशा असामाजिक तत्त्वांना शेखर गोरे प्रतिष्ठानच्या ‘रट्टा ब्रिगेड’ चा मोठा धाक असल्याचे चित्र जनतेला पाहायला मिळत आहे.


    महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना काढल्यानंतर शेखर गोरे यांनी लाडक्या बहिणींना आपल्या मार्फत ही काही मदत व्हावी,या उद्देशाने त्यांच्या संपर्क कार्यालयामधून माण – खटाव मधील जवळपास १२०० पुन्हा अधिक महिलांचे लाडकी बहीण योजनेचे ‘ऑनलाइन फॉर्म ‘ निशुल्क भरण्याचे काम केले.


     शेतकऱ्यांसाठी शेतीशी निगडीत कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान मार्फत अशा शेतकऱ्यांना सर्वोत्तपरी मदत करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये शेतीशी निगडीत कोणत्याही योजनांचे फॉर्म भरणे असो, विज बिलासंदर्भात काही मदत हवी असेल किंवा शेतीशी निगडित कोणत्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्वतः जातीने कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या बरोबर येतात आणि संबंधित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. वीर जवान परिवारांसाठी त्यांनी केलेल्या भरीव मदतीबाबत ही जनतेत त्यांचे विशेष कौतुक होते. याशिवाय अनेक ठिकाणी स्वखर्चातून रस्ते करून त्यांनी जनतेचा रस्त्याचा प्रश्न ही सोडवला आहे, अनेक ठिकाणी हाय मास्ट लाईट पोलही मोफत दिले आहेत,पाण्याच्या टाक्या मोफत ही बांधून दिले आहेत.


     शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान मार्फत त्यांनी माण खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला.गावोगावी कार्यकर्ते तयार केले.


       शेखर गोरे हे संवेदनशील पण विचारी,प्रगल्भ व कृतिशील नेतृत्व आहे. माण खटाव मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलायचा त्यांचा मानस आहे. विशेषतः पाणी,शिक्षण,आरोग्य,शेती व रोजगार यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे. राजकारण स्वार्थासाठी न करता जनहितासाठी करावे अशी विचारसरणी त्यांनी जोपासलेली आहे. आता मतदारसंघात शेखर गोरे यांना मानणारा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे. विशेषत: युवकांना शेखर गोरे यांच्या बद्दल नुसतं आकर्षण नाही तर एक लोकसेवक आणि लोकाभिमुख नेतृत्व दिसत आहे. शेखर गोरे हे मतदार संघाचा कायापालट करतील अशी त्यांना खात्री वाटतेय. त्यामुळेच दिवसेंदिवस शेखर गोरे यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.


     “एक उत्कृष्ट नेता तोच असतो जो मार्ग जाणतो, मार्गाने जातो आणि मार्ग दाखवतो.” या विचारानुसार त्यांच्या उक्तीतून नव्हे तर कृतीतूनसुद्धा हे वारंवार सिद्ध झाले आहे.


     राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे ते लहान बंधू आहेत.


मंत्री जयकुमार गोरे यांच्या आमदारकीच्या पहिल्या २००९ व २०२४ च्या निवडणुकीतील विजयात शेखर गोरे यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर २०१२ साली शेखर गोरे यांनी माण पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि ते निवडून आले तिथूनच त्यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या याच कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन, या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द दिला होता.


       शेखरभाऊ गोरे यांचा दि. २ एप्रिल रोजी वाढदिवस असतो. बॅनरबाजी मुळे गाव पातळीवर विद्रुपीकरण होत आहे. अनेकदा युगपुरुषांच्या प्रतिमा अशा बॅनरबाजी मुळे झाकल्या जातात. यावर समाज माध्यमातून सडकून टीका होते याची जाणीव ठेवून त्यांनी बॅनरबाजी बंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय अनेकांसाठी दिशादर्शक ठरला आहे.


       यावर्षी बुधवार दि.२ एप्रिल रोजी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत दहिवडी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी श्री गोरे उपस्थित राहणार असल्याची जन माहिती शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष वैभव मोरे यांनी दिली आहे.



कार्यकर्ते, नेतेमंडळी तसेच जनतेने कोणत्याही भेटवस्तू पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये तसेच आपल्या गावांमध्ये बॅनर लावू नये असे नम्र आवाहन या संवेदनशील नेत्यांनी केले आहे.


     जनतेची सेवा करताना शेखर भाऊ हे जराही मागे हटत नाहीत. समाजिताप्रती संवेदनशील असलेल्या जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकसेवेचा वसा वारसा घेऊन लोकाभिमुख कामे करण्यास ते सदैव सज्ज असतात. स्वकर्तुत्वाच्या बळावर यश मिळवणे हा त्यांचा गुणविशेष सर्वसामान्यांना भावला आहे. वैयक्तिक गरजा मर्यादित ठेवून नैतिकतेच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या या लोकसेवकास, लोकाभिमुख नेत्यास लोकसेवा टाइम्स या माध्यमाच्या सर्व परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.