जिल्हाताज्या घडामोडीविशेषसामाजिक
Trending
रामनवमीनिमित्त दहिवडीत आज रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम तर उद्या होणार महाप्रसाद भंडारा….
वृत्त – दहिवडी,ता.माण, जि.सातारा
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी म्हणजेच नवव्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. त्यामुळे यंदाची रामनवमी ही ६ एप्रिल २०२५ रोजी रविवारी साजरी करण्यात येत आहे. प्रभू श्री रामाचा जन्मउत्सव यादिवशी भाविक मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. देशभर रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. रामनवमी साजरी करण्याचे विशेष महत्व आहे.रविवार दि ६ एप्रिल रामनवमीचा मुहूर्त सकाळी ११ वाजून ०८ मिनिटे ते दुपारी १ वाजून ३९ मिनिटे असेल असे पंचांगात सांगितले आहे.
प्रभूंनी श्रीरामांच्या रामनवमी निमित्त महाराष्ट्रात सर्व देशात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीला अनुसरून सातारा जिल्ह्यातील, माण तालुक्यामध्ये दहिवडी शहरामध्ये रामनवमी निमित्ताने रविवार, दि. ६ रोजी सकाळी ,१० वाजल्यापासून श्रीराम मंदिर परिसरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले अहे, प्रत्येक रक्तदात्यास राजा शिवछत्रपती भाग १ व भाग २ हे पुस्तक भेट देण्यात येणार आहे.
याबरोबरच रामनवमीचे औचित्य साधून विविध धार्मक कार्यक्रम ही श्रीराम मंदिरात सुरू आहेत. गुरुवारपासून श्रीराम जन्मोत्सव दहिवडी येथील श्रीराम मंदिरात सुरू झाला आहे. दररोज सकाळी रामरायाची विधिवत पूजा झाल्यानंतर दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. दररोज संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत सेलू जिल्हा परभणी येथील प्रसिद्ध कीर्तनकार वेदांत दशरथे यांची कीर्तन सेवा होत आहे. त्यानंतर विविध भजनी मंडळांची भजने होत आहेत.



