जिल्हामहाराष्ट्रविशेषसामाजिक
Trending

श्रीरामनवमी दहिवडी शहरात मोठ्या उत्साहात साजरी ! दि.३ ते ७ एप्रिल सलग पाच दिवस झाले विविध धार्मिक कार्यक्रम…

वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.


      हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी म्हणजेच नवव्या दिवशी श्रीरामनवमी साजरी केली जाते. त्यामुळे यंदाची रामनवमी ही ६ एप्रिल २०२५ रोजी रविवारी साजरी करण्यात आली. प्रभू श्री रामाचा जन्मउत्सव यादिवशी भाविक मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. देशभर श्रीरामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. रामनवमी साजरी करण्याचे विशेष महत्व आहे.रविवार,दि .६ एप्रिल रोजी रामनवमीचा मुहूर्त सकाळी ११ वाजून ०८ मिनिटे ते दुपारी १ वाजून ३९ मिनिटे असेल असे पंचांगात सांगितले.



     प्रभू श्रीरामांच्या रामनवमी निमित्त महाराष्ट्रासह देशात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीला अनुसरून सातारा जिल्ह्यातील,माण तालुक्यामध्ये दहिवडी शहरामध्ये श्रीरामनवमी निमित्ताने शहरातील मुख्य श्री राम मंदिरात ,गुरुवार दि.३ एप्रिल ते सोमवार दि.७ एप्रिल या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंददायी वातावरणात साजरे झाले.


       बुधवार,दि.३ एप्रिल रोजी सकाळी.७ ते ८ या वेळेत श्रींची पुजा,दु.३ ते ५ स्वर शोभा भक्तिगीत मंडळ पुणे यांचा भक्ती गीताचा कार्यक्रम, सायं.६ ते ८ श्री वेदांत दशरथे सेलु जिल्हा परभणी यांचे श्रीराम प्रवचन, रात्री ९-३० ते ११ या वेळेत श्री गणू बुवा भजनी मंडळ गोंदवले बुद्रुक यांचेकडून राम नामाचा जागर व भजनाचा कार्यक्रम होवून या दिवसाची सांगता झाली.


       शुक्रवार, दि.४ रोजी स.७ ते ८ श्रीं ची पुजा,स.८ ते ११ श्री चैतन्य जप संकुल शाखा क्र.१ यांचा श्रीराम नाम जप, दु.३ ते ५ या वेळेत श्री चैतन्य जप संकुल शाखा क्र.२ यांचा भजनाचा कार्यक्रम,सायं.६ ते ८ श्री वेदांत दशरथे सेलु जिल्हा परभणी यांचे श्रीराम प्रवचन,रात्री ९-३० ते ११ श्री उद्धव बोराटे तटवस्ती बिदाल यांचेकडून रामनामाचा जागर व भजनाचा कार्यक्रम होऊन या दिवसाची सांगता झाली.


     शनिवार, दि.५ रोजी स.७ ते ८ श्रींची पुजा,स.८ ते ११ श्री चैतन्य जप संकुल शाखा क्र.२ यांचा श्रीराम नाम जप, दु.३ ते ५ श्री चैतन्य जप संकुल शाखा क्र.१ यांचा भजनाचा कार्यक्रम,सायं.६ ते ८ श्री वेदांत दशरथे सेलु जिल्हा परभणी यांचे श्रीराम प्रवचन होऊन प्रवचनाची सांगता, रात्री ९ ते १०-३० श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ दहिवडी यांच्या साथीने चि. गोपाळ सोनपावले यांचे सुश्राव्य किर्तन,रात्री १०-३० ते ११ या वेळेत वारकरी भजनी मंडळ दहिवडी यांचेकडून रामनामाचा जागर आणि भजनाचा कार्यक्रम होऊन या दिवसाची सांगता झाली.


      रविवार,दि.६ रोजी स.६ ते ८ श्रीराम,श्री सीता माता,श्री लक्ष्मण व श्री हनुमान यांच्या श्रीमूर्तींचा महाअभिषेक,स.१० ते दु.१२-१५ तबला विशारद चैतन्य अमोल जोशी यांच्या साथीने तसेच श्री जगन्नाथ पोळ यांच्या हार्मोनियम साथीने, म्हासुर्णे,ता.खटाव येथील श्री प्रथमेश बाळकृष्ण इनामदार यांचे श्रीराम जन्माचे सुश्राव्य किर्तन व पुष्पृष्टी झाली.



दु.३ ते ५ गुरुकृपा महिला भजनी मंडळ दहिवडी यांचा भजनाचा कार्यक्रम,सायं.६ वाजता भव्य दीपोत्सव व फटाक्यांची आतिषबाजी, सायं.६-३० ते १० स्वरांगिनी ग्रुप कराड प्रस्तुत गीत रामायण कु.साक्षी दीपक कालवडेकर यांनी सादर केले.


      श्रीराम नवमीच्या या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” ही उक्ती सार्थ ठरवत सकाळी १० वाजल्यापासून श्रीराम मंदिर परिसरात,आयुष ब्लड बँक वडूज यांच्यासाथीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले,प्रत्येक रक्तदात्यास राजा शिवछत्रपती भाग १ व भाग २ हे पुस्तक भेट दिले. यावेळी एकूण ७७ रक्तदात्यांनी आपले रक्त देऊन या रामनवमीची कार्यक्रमाची शोभा वाढवली.



      सोमवार दि.७ रोजी सकाळी नैमित्तिक पुजा,संध्याकाळी ५ वाजता श्रींची महाआरती झाली.त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.या महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो श्रीराम भक्तांनी घेतला.श्रीराम युवा प्रतिष्ठान दहिवडी यांच्यामार्फत या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



यावेळी प्रतिष्ठानने या कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व श्रीराम भक्तांचे,जनतेचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमांमुळे परिसरात मोठे अध्यात्मिक वातावरण तयार झाले आहे.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.