
वृत्त दि.- मंगळवार,१५ एप्रिल २०२५
वृत्त – कणसेवाडी,ता.खटाव,जि.सातारा
सातारा जिल्ह्यातील खटाव, तालुक्यामधील मौजे कणसेवाडी गावची श्री खंडोबा देवस्थान ची यात्रा सालाबाद प्रमाणे दि.१६ एप्रिल ते १७ एप्रिल २०२५ या दोन दिवसात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
या पार्श्वभूमीला अनुसरून, मंगळवार दि.१५ एप्रिल रोजी कणसेवाडीतुन सकाळी ठीक ९ वाजता, श्री क्षेत्र जेजुरी येथून पवित्र ज्योत आणण्यासाठी श्री खंडोबा भक्तांचे व कणसेवाडी ग्रामस्थांचे प्रस्थान होत आहे.
बुधवार,दि.१६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता कणसेवाडी व येथे श्रीक्षेत्र जेजुरी येथून आणलेल्या ज्योतीचे आगमन होऊन भाविकांसाच्या साथीने गवातु्तून मिरवणूक काढून दर्शनासाठी खंडोबा मंदिरासमोर ठेवण्यात येते.दुपारी ४ ते ६ वाजता कणसेवाडी गजी मंडळाचा कार्यक्रम,
सायंकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत झेंडा व पालखीची गावातून मिरवणूक होणार आहे.मिरवणुकीसाठी घोडा व अमोल बँड निढळ यांच्या आयोजन केले आहे.रात्री ११ वाजता सचिन वाघापुरे जागरण मंडळ,जय मल्हार वाघे,मुरळी,मंडळ पार्टी अंधुर्णकर ता.इंदापुर.जि.पुणे यांचे आयोजन केले आहे.

