क्राईमजिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशप्रशासकीयमहाराष्ट्रविशेषसामाजिक
Trending

पहेलगाम व पश्चिम बंगाल येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ ; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान माण‌ यांचा एल्गार !

वृत्त दि.- मंगळवार २९ एप्रिल २०२५

वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.


        श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान माण,जि.सातारा यांनी पश्चिम बंगाल येथे समाजविघातक प्रवृत्ती कडून झालेल्या दंग्या – धोप्यांबद्दल आणि जम्मू – काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत मंगळवार दि.२९ एप्रिल २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी माण – खटाव यांना दहिवडी येथील कार्यालयामध्ये निवेदन देत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.



     या निवेदनात असे म्हणाले आहे की,देशाच्या लोकसभेने वक्फ बोर्ड सुधारणा कायदा-२०२५ बहमताने संमत केला व त्याचे कायद्यात रुपांतर झाले. सदर कायद्याला विरोध म्हणून मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद या गांवी, कुठल्याही सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तेथील घुसखोर व दंगेखोरांनी दंगे भडकवले आहेत. या निमित्त्याने तेथे अल्पसंख्याक असलेल्या हिन्दुवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडविल्या आहेत. लुटालुट, जाळपोळ, दगडफेक, सैन्यदलावर हल्ले असे प्रकार तेथे राजरोसपणे सुरु आहेत.हिन्दुच्या मालमतेची हानी व हिन्दु प्रार्थनास्थळांची,हिन्दु महिलांची विटंबना, तसेच निवडून निवडून केवळ हिन्दुंची घरे, दुकाने व वाहने जाळण्याच्या भयंकर प्रकरणांनी एखाद्याचे चित्त विचलीत करणारी दृष्ये समाज माध्यमांवर सर्व देशभराने पाहिली आहेत. तेथील हिन्दुंवर, त्यांच्या मंदिरांवर,त्यांच्या बालकांवर, त्यांच्या ख्रियांवर हल्ले करुन त्यांना आपले घरदार सोडून तेथून पलायन करण्यास भाग पाडले जात आहे. हे सर्व खूप भयंकर आहे.खरेतर हा हिन्दुस्थानच्या सार्वभौमत्वावर घातलेला घाला आहे.



      या सर्व पाश्वभूमीवर तेथील राज्यसरकार दंगलखोरांना नियंत्रित करण्याबाबत पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी तेथील राज्यसरकारचा आम्ही जाहर निषेध करीत आहोत. कायदा व सुव्यवस्था हा प्रत्येक राज्यशासनाच्या अखत्यारीतील भाग असून सदर राज्य सरकार संविधानाची मूलतत्वे राखण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचे व मुर्शिदाबाद येथील अल्पसंख्याक हिन्दुंचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालून पश्चिम बंगाल येथील राज्य शासन तातडीने बरखास्त करावे,तेथे त्वरीत राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आम्ही आज करत आहोत.



         जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 28 जणांची निर्घृन हत्या केली. या घटनेचा हिंदू समाज म्हणून आम्ही निषेध करीत आहोत.यात खेदाची गोष्ट आहे की अतिरेक्यांनी नाव आणि धर्म विचारून नागरिकांची हत्या केल्यात. वास्तविक पाहता संपूर्ण भारतात अनेक जाती – धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. जम्मू-काश्मीरच्या भागांमध्ये झालेला हा हल्ला भ्याड हल्ला आहे. अतिरेक्यांना कोणताही धर्म नसतो असे सांगणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यावे की,धर्म विचारून हिंदू असलेल्या पर्यटकांची हत्या करण्यात आली आहे. अतिरेकी पुन्हा त्यांच्या जुन्या व घाणेरड्या संस्कारांवर येऊन हिंदूंची हत्या करीत आहेत. सत्तावीस पर्यटकांची हत्या झाली आणि अनेक पर्यटक जखमी झाले याही प्रकरणाचा आम्ही निषेध करीत आहोत.हा हल्ला करणाऱ्या मारेकऱ्यांना सरकारने पकडून फाशीची शिक्षा द्यावी आणि भविष्यात असे भ्याड हल्ले होऊ नयेत,यासाठी या हल्लेखोरांपाठीमागील मूळ सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.या सर्व उपरोक्त घटनेचा आम्ही पुनश्च एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो.अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



      यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.