आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनजिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रविशेषसामाजिक
Trending

दहिवडीच्या आदर्श शाळेचा राज्यात डंका ! आदर्श शाळेचे १४५ विध्यार्थी अभिरुप आणि N. N.S.E परीक्षेत चमकले…

आदर्श शाळा म्हणजे विश्वास , उत्कृष्टता, गुणवत्ता, यशाची शंभर टक्के हमी !

वृत्त दि.- २९ एप्रिल २०२५

वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.


        सातारा जिल्ह्यातील;माण तालुक्यातील, दहिवडी येथील आदर्श मराठी प्राथमिक माध्यमिक शाळेने यशाची उज्जल परंपरा कायम राखत अभिरूप NSSE,BDS,मंथन,OLYMPIAD पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा,या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये तब्बल १४५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत त्यामुळे आदर्श शाळेच्या यशाचा आलेख सतत उंचावत आहे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घातली आहे .



       ज्या प्रमाणे फुलापाखाराना पंख असतात म्हणून ते आनंदाने बागडतात.त्याप्रमाणे आदर्शमध्ये मुलांना आत्मविश्वासाचे बळ दिले कि ते उंच झेप घेतात .शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या अभिरूप व नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा या दोन्ही परीक्षांमध्ये आदर्शच्या विध्यार्थ्यानी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, केंद्रस्तरीय निकालाच्या गुणवत्तेचा सर्वाधिक विध्यार्थी गुणवत्तेत येण्याचा विक्रम मोडला आहे.



      जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेउन येतो त्या संधीच सोन करणे आपल्या हातात असते आदर्शचे विध्यार्थी हा ज्ञान व संपत्तीचा खरा खजिना आहे. चालू वर्षी आपल्या आदर्श शाळेने NSSE व अभिरूप म्हणजेच IASपरीक्षा घेतल्या त्यामध्ये १४५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. NSSEअभिरूप म्हणजेच IASपरीक्षेत उत्तुंग यश मिळवून आई वडील शिक्षक शाळा दहिवडी गावाचे नाव राज्याच्या पटलावर नेणारे हे विध्यार्थी भावी IAS असल्याची चर्चा दहिवडी पंचक्रोशीत आहे.यश प्राप्त करण्यासाठी खूप परिश्रमाची गरज आसते.आव्हान स्वीकारणे व धाडसाने पूर्ण करणे हे वाक्य आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी सार्थ करून दाखविले आहे. हे या यशावरून समजते आदर्श शाळेत यावर्षी NSSE, IASपरीक्षा मध्ये राज्यस्तरावर २२ , जिल्हास्तरावर २५,व केंद्रस्तारांवर ९८ विद्यार्थी चमकले आहेत माननीय मुख्याध्यापक श्री. दडस सर यांचे प्रभावी नियोजन ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे पालकांचे मत आहे.



        आदर्शचे आदर्श विध्यार्थी हे समाजाचा भक्कम आधारस्तंभ असतील यात शंकाच नाही. आदर्श दरवर्षी प्रमाणेच यशाची परंपरा कायम ठेवतात या वर्षीही शाळेची यशस्वी वाटचाल विद्यार्थ्यांनी सुरु ठेवली आहे.


      आजपर्यंत या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर ,इंजिनीयर,प्रशासकीय अधिकारी,सैनिक अशा विविध श्रेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत . इतर शाळांना हेवा वाटावा अशीच आदर्श शाळा नावाप्रमाणेच देशात आदर्श ठरली आहे.



       या यशाबद्दल विध्यार्थ्यांचे शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे अभिनंदन ग्रामविकास व पंचायत राजमंत्री ना.जयकुमार गोरे सिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक आर.बी.जाधव सर सचिव माननीय सौ.शीला जाधव तसेच सर्वसंचालक मंडळ व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.