जिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
Trending

दहिवडीच्या नगराध्यक्षपदाचा पुष्पहार; सौ.नीलम अतुल जाधव यांच्या गळ्यात !

वृत्त दि. – मंगळवार, १३ मे २०२५

वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.


   ‌‌     सातारा जिल्ह्यातील;माण तालुक्याचे केंद्रबिंदू असणाऱ्या दहिवडी शहरात मागील काही दिवसांमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली होती.नगराध्यक्ष सागर पोळ यांना पदच्युत केल्यानंतर उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुखे यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.



     दहिवडी नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी नीलम जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडीची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे चित्र माणदेशाला पाहायला मिळत आहे.या बदलामुळे अगदी सहजपणे‌‌ नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीकडून भाजपकडे आणण्यात ग्रामविकासमंत्री ना.जयकुमार गोरे यांनी यश मिळवले आहे.



        प्र.नगराध्यक्ष निवडीनंतर नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.मंगळवार १३ मे रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत‌ मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्याकड़े अर्ज दाखल करण्याची मुदत‌ होती.या मुदतीत दुपारी पावणेदोनच्या सुमारास नगराध्यक्षपदासाठी नीलम जाधव यांनी अर्ज दाखल केला.या अर्जावर सूचक म्हणून उज्ज्वला पवार,अनुमोदक म्हणून रूपेश मोरे यांनी सह्या केल्या होत्या.अर्ज दाखल करताना नगरपंचायतीतील भाजपचे गटनेते धनाजी जाधव,राष्ट्रवादीचे गटनेते सुरेंद्र मोरे,प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे,नगरसेवक रूपेश मोरे,महेश जाधव,उज्वला पवार,राणी‌ अवघडे यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत,अतुल जाधव,संजय गांधी, माजी नगराध्यक्ष सतीश जाधव,सुरज गुंडगे,लालासाहेब ढवाण,नंदकुमार खोत,लक्ष्मण जाधव,शरद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


      ‌‌उपजिल्हाधिकारी भूसंपादन तथाप्रभारी प्रांताधिकारी माण – खटाव तथा पीठासन‌ अधिकारी राजश्री मोरे यांनी दाखल अर्जाची छाननी केली. यात सदर अर्ज वैध‌ ठरला.नगराध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक सोमवार दि.१९ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार असल्यामुळे निवडीची अधिकृत घोषणा त्याचवेळी असेल. नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सौ. नीलम अतुल जाधव यांच्याच गळ्यात नगराध्यक्ष पदाचा पुष्पहार पडणार असल्याचे जाहीर आहे.


     सौ.नीलम अतुल जाधव या दहिवडी नगरपंचायत प्रभाग क्र. ९ च्या नगरसेविका असून त्या शहरातील आयडियल महिला गणेश मंडळाच्या कार्याध्यक्षा आहेत. आयडियल गणेश मंडळाच्या मार्फत सातत्याने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन सौ.जाधव करत असतात.याशिवाय श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ,दहिवडी यांच्यामार्फत साजरा होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा विशेष पुढाकार असतो. 

      त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विशेषतः आयडियल महिला गणेश मंडळ यांनी सौ.नीलम जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


सत्ता नसताना पदे; विलक्षण अभूतपूर्व योगायोग !

दहा वर्षापूर्वी पंचायत 

पंचायत समिती, माण मध्ये राष्ट्रवादी काग्रेसची सत्ता होती. अतुल जाधव विरोधी पक्षाचे पंचायत समिती सदस्य होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी होऊन पंचायत समिती सभापतींवर अविश्वास ठराव आणला गेला व विरोधात असणाऱ्या अतुल जाधव यांना सभापती पदाची संधी मिळाली.

      याचप्रमाणे यावेळी दहिवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसेची सत्ता होती.नगराध्यक्षांवर त्यांच्याच चार सदस्यांनी व इतर सदस्यांनी मिळून अविश्वास ठराव आणला व त्यांच्या जागी अतुल जाधव यांच्या पत्नी नीलम जाधव यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली.नगराध्यक्ष पदाच्या आजच्या निवडीनंतर या विलक्षण, अभूतपूर्व योगायोगाची चर्चा रंगली होती.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.