आरोग्य व शिक्षणग्रामसभाजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
Trending



यावेळी माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव म्हणाले की,आजची नगराध्यक्ष पदाची निवड खरी तर एक ते दीड वर्षांपूर्वीच होणे अपेक्षित होती. आम्ही १४ नगरसेवकांनी मिळून या अविश्वास ठरवा विषयी मागील १४ महिन्यांपूर्वी पासून आमचे प्रयत्न चालू होते परंतु काही शासकीय अडचणींस्तव,या प्रक्रियेला दिरंगाई झाली. आम्ही १४ नगरसेवकांनी मिळून ताक्तालीन नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल केला.यासाठी मंत्री श्री जयकुमार गोरे यांची यासाठी विशेष मदत मिळाली. आम्हा १४ नगरसेवकांसह मंत्री गोरे व त्यांच्या पत्नी सौ.सोनिया गोरे यांच्यामुळे हा अविश्वास ठराव यशस्वी झाला आणि यामुळे एकमुखी,बिनविरोध असा आमच्या घरातला नगराध्यक्ष करू शकलो, याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे की, आम्ही हे करू शकलो.
यावेळी सौ सोनिया गोरे म्हणाल्या,मागील दहा वर्षांपासून दहिवडी शहरामधील एक महिला खूप जोमाने समाजकार्य करत असताना मी पाहत आहे.हळदी कुंकू असो,वेगवेगळ्या छोटे-मोठे कार्यक्रम असोत,वेगवेगळे सण – समारंभ असो किंवा गणेशोत्सव असो की नवरात्र उत्सव या प्रत्येक वेळी खूप उत्साहाने,हीरारीने भाग घेऊन काम करणारी महिला कोण असेल तर ती नीलम ताई जाधव होय ! त्यांच्या याच समाजकार्याची हीच दखल घेऊन मी आणि मंत्री श्री गोरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी सौ. निलम जाधव यांची निवड करण्याचा निर्णय घेतला. स्त्री असो किंवा पुरुष काम करण्याची सर्वांना समान संधी मिळायला हवी.सर्व दहिवडीवासियांनी एकत्र येऊन एकसंघ दहिवडी ठेवण्याचा प्रयत्न करून एक आदर्श दहिवडी, एक आदर्श नगरपंचायत करण्यासाठी, गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी हिरारीने भाग घेतला पाहिजे.सर्व विरोधक व सहकारी पक्षांनी एकत्र आल्यामुळे आजचे परिवर्तन झाले आहे.यापुढेही सर्वांनी असेच एकत्र येऊन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या साथीने दहिवडीचा विकास करण्याचे काम करूया,दहिवडी शहर सुंदर शहर बनवूया,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.