आरोग्य व शिक्षणक्राईमजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रविशेषसंपादकीयसामाजिक
Trending
दहिवडी पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी ! जिल्हा पोलीस प्रमुखांनी सपोनि दत्तात्रय दराडे यांचे अभिनंदन करून दिले रोख रक्कमचे बक्षीस…
वृत्त दि. – २० मे २०२५
वृत्त – सातारा.
सातारा जिल्ह्यातील; माण तालुक्यातील, दहिवडी पोलीस स्टेशनला सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वात गतवर्षी जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन चा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर काही कालावधीमध्येच सपोनी अक्षय सोनवणे यांची म्हसवड पोलीस स्टेशन येथे बदली झाली. त्यानंतर दहिवडी पोलीस स्टेशनचा कार्यभार सपोनि दत्तात्रय दराडे यांनी स्वीकारला.सोपोनि दत्तात्रय दराडे यांनी दहिवडी पोलीस स्टेशन चा कार्यभार स्वीकारल्यावर त्यांच्यासमोर अनेक क्लिष्ट प्रसंगातील गुन्ह्यांचा तपास करण्याचे आव्हान उभे राहिले. परंतु पोलीस खात्यातील आपल्या दांडग्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणले. पोलीस प्रशासन आणि न्यायपालिका या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने, न्यायदानाच्या प्रक्रियेत अनेक गुन्ह्यांमध्ये आपला मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात दहिवडी पोलीस स्टेशन चा नावलौकिक वाढला आहे.
सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या याच कामाची दखल घेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी श्री दराडे यांना अभिनंदन पत्र व २५,००० रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून देत त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दहिवडी पोलीस ठाणे येथे दाखल असले मिसिंग रजि, नं. २१/२०२५ मधील मिसिंग व्यक्ती योगेश सुरेश पवार, वय २८ वर्षे रा. गोंदवले बु. ता. माण जि. सातारा हा दि. १८/०३/२०२५ रोजीपासुन मिसिंग झाला असलेबाबत दहिवडी पोलीस ठाणे येथे मिसिंग दालख होती.सदरील मिसिंगचे तपासमध्ये मिसिंग व्यक्तीचे सी.डी.आर, चे विश्लेषण करुन गोपनिय बातमिदारा मार्फत माहिती काढून मिसिंग व्यक्तीचा शोघ घेवुन त्याचा खुन झाला असल्याचे निष्पन्न करुन दहिवडी पोलीस ठाणे गुरनं,८५/२०२५ भा,न्या.स.कलम १०३,२३८,६१(२),(अ) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपी यांना मुंबई,पुणे व बारामती येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांनी सदर इसमाचा खुन करुन मयताची बॉडी त्याचे गाडीसह कॅनॉलमधील पाण्यात टाकुन दिल्याचे कबुल केले व त्यानंतर सदरचे घटनास्थळ दाखबुन कनॉलमधील वाहते पाण्यातुन मयाताची बँडी व गुन्हयात वापरलेले हत्थार हस्तगत करुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
एकंदरीत आपण नमुद गुन्हयाचे अनुषंगाने कोणतीही माहिती व धागेदोरे नसताना कौशल्यपूर्ण तपास,सी.डी.आर चे तांत्रीक विश्लेषण,घटनास्थळाची पहाणी, आजूबाजूच्या साक्षीदारांकडे केलेली विचारपूस व त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने आपले गुणकौशल्याचा व निर्णय शक्तीचा परिपूर्ण वापर करुन, वैयक्तीक लक्ष पुरवून, कार्यतत्परता,प्रसंगावधान दाखवून,जलद कार्यवाही केल्यामुळे मिसिंग झालेल्या व्यक्तीचा खुन केल्याचे निष्पन्न करुन खुनासारखा अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
आपण केलेल्या प्रशंसनीय व सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत आपले “हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच यापुढ़ील काळातही आपण कर्तव्यतत्पर राहुन जिल्हा पोलीस दलाची क्षमता व परिणामकारकता वाढविण्यास प्रयत्नशील राहाल आसा आम्हास दृढ विश्वास आहे. शुभेच्छांसह…
अशा आशयाचे अभिनंदन पत्र व रोख रक्कम देत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक,श्री समीर शेख यांनी दहिवडीचे पोलीस स्टेशनचे सपोनि दत्तात्रय दराडे यांना देत,श्री. दराडे यांचेसह दहिवडी पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफचे अभिनंदन व कौतुक केले आहे.



