जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक
Trending

शेखरभाऊ गोरे होणार आमदार ! कार्यकर्त्यांच्या कष्टांना लवकरच मिळणार न्याय : शेखर गोरे

हभप वैभव मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा...

वृत्त दि.- गुरुवार, 26 जून २०२५

वृत्त – लोधवडे, ता.माण,जि.सातारा


      सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच सातारा जिल्ह्यातील माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शेखर गोरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि खंदे समर्थक म्हणून ओळख असणारे शांत,संयमी,भावनिक पण प्रसंगी आक्रमक स्वभावाचे हभप वैभव मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार, दि.२६ जून रोजी माण तालुक्यातील‌ लोधवडे या त्यांच्या मूळ गावी मोठ्या उत्साहात साजरा झाला.या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी.१० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व रोग निदान शिबिर आणि रात्री मनोरंजनात्मक होम मिनिस्टर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.



     हभप वैभव मोरे हे शेखर भाऊ गोरे सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आहेत.वैभव मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी शेखर गोरे हे परदेशातून येऊन कार्यक्रम स्थळी उपस्थित राहिले,यातूनच श्री.गोरे व वैभव मोरे यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध अवघ्या माणदेशाला पाहायला मिळाले.रात्री ८-३० मि. वाजताचे दरम्यान सर्वप्रथम वैभव मोरे यांचे औक्षण करून व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तद्नंतर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून श्री मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



       यावेळी सर्वप्रथम वैभव मोरे यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आलेल्या सर्व उपस्थित सामाजिक,धार्मिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे,आप्तेष्टांचे व मित्रपरिवाराचे या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. शेखर गोरे यांचा उल्लेख करताना ते म्हणाले,मागील पंधरा वर्षापासून आतापर्यंत माझ्या कार्यक्रमासाठी श्री.गोरे हे पहिल्यांदाच आले आहेत,शेखर भाऊ हे काही कारणास्तव परदेशात असल्याने ते या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकतील की नाही ? अशी बहुतेकांना साशंकता होती परंतु मला खात्री होती की,श्री.गोरे हे माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहणारच ! निष्ठा,प्रेम,त्याग आणि चिकाटी नेत्याप्रती ठेवल्यास नेताही आपल्यावर त्याच मायेने प्रेम करतो, हे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितले. फार वेळ न घेता,पुन्हा एकदा सर्व उपस्थित आमचे स्वागत करून आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.



      यावेळी शेखर गोरे म्हणाले, महाराजांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहण्याच्या उद्देशाने मी दुबई शहरातून भारतात येण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत.वर्तमान स्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धजन्य परिस्थिती असताना,भारतात परतण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला परंतु या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. यापुढे ते म्हणाले,एक आदर्श कार्यकर्ता कसा असावा याचे उदात्त उदाहरण म्हणजे वैभव मोरे महाराज होय. महिमानगड येथून सुरू झालेल्या माझ्या राजकीय प्रवासात सुरुवातीपासून ते आज तागायत, तब्बल १३ वर्षांहून अधिक काळ महाराज माझ्याबरोबर आहे. या प्रवासात वैभव महाराजांनी कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक स्वार्थ जोपासला नाही, अशाच निस्वार्थ वृत्तीमुळे आज या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी हजारोंची गर्दी या ठिकाणी उभी आहे. माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब यांच्या लोधवडे गावात वैभव मोरे यांच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता माझ्या पक्षाचे काम करतो,याचा मला पुरेपूर अभिमान आहे,यासाठी खरोखरच महाराज तुम्हाला शेखर गोरेंचा सलाम आहे. वैभव महाराज यांना निस्वार्थ वृत्तीने काम करताना फारसा व्यक्तिगत, कौटुंबिक विकास साध्य करता आला नाही, परंतु त्यांच्या याच निस्वार्थवृत्तीमुळे वैभव मोरे यांचे स्थान माझ्या हृदयात आहे,असेही त्यांनी यावेळी ठासून सांगितले. वैयक्तिक, कौटुंबिक जीवनाबरोबरच महाराजांच्या राजकीय इच्छा – आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा शेखर गोरे ताकतीने तुमच्या बरोबर आहे, अशी ग्वाही श्री.गोरे यांनी दिली.



       प्रसंगानुरूप राजकीय विषय निघाल्यानंतर श्री.गोरे म्हणाले,‌आगामी नगरपालिका तसेच नगरपंचायतीच्या निवडणूका सप्टेंबर महिन्यात होत आहेत. या निवडणुका झाल्यानंतर, निवडणूक निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याच्यात शेखर गोरे हे जनतेच्या आशीर्वादाने आमदार होणार आहेत,असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माण – खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी माझ्या तमाम कार्यकर्त्यांनी अपरिमित कष्ट घेतले आहेत आणि याचीच फुलश्रुती म्हणून जानेवारी – फेब्रुवारी महिन्याच्या आसपास आपण घेतलेल्या भूमिकेला न्याय मिळेल. यानंतर पुन्हा एकदा त्यांनी हभप वैभव मोरे यांना मी व माझे कुटुंब तसेच उपस्थित जनतेच्या वतीने आणि त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपल्या मनोगताची सांगता केली.


     यावेळी दहिवडीच्या नगरसेविका सुरेखा पखाले,शशिकांत देशमुख,जयप्रकाश कट्टे, दत्तात्रय हांगे,धनाजी माने,राजू झगडे यांच्यासह माण – खटाव तालुक्यातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.स्नेहभोजनाने या अभिष्टचिंतन सोहळ्याची सांगता झाली.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.