आरोग्य व शिक्षणग्रामसभाजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक
Trending
दहिवडीत 15 कोटी 66 लाख रुपयांच्या विकास कामांचे; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हस्ते उद्या भूमिपूजन !
वृत्त दि.- शनिवार, दि.१२ जुलै २०२५
वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.
ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील, माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये १५ कोटी ६६ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन रविवार १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दहिवडीत करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने भव्य सत्कार समारंभ व जाहीर सभेचे आयोजन स्वाती मंगल कार्यालय येथे केले असल्याची माहिती दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीलम जाधव यांनी दिली.
१४ वा वित्त आयोग मुलभूत अनुदान या योजनेतून नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेत व्यापारी संकुल (टप्पा १ तळघर आणि तळमजला) बांधकाम करणे.माझी वसुंधरा २.० व ३.० अंतर्गत विविध विकासकामे करणे. सर्वसाधारण रस्ता अनुदान सन २०२१-२२, २०२२-२३ व २०३३-२४ यामधून रस्त्यांची कामे करणे. स्वच्छ भारत अभियान नागरी २.० मधून सामुदायिक शौचालय दुरुस्ती करणे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी २.० मधील शहर स्वच्छता कृती आराखडा या योजनेतून सार्वजनिक व सामुदायिक शौचालय व मुतारी बांधकाम करणे.
तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सिध्दनाथ व्यायाम शाळा बांधणे, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामे करणे यासोबतच अंतर्गत काँक्रीट रस्ते करणे, डांबरीकरण करणे, गटर व परिसर सुशोभिकरण आदी कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा नीलम जाधव, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, सर्व नगरसेवक व भारतीय जनता पार्टी यांनी केले आहे.याशिवाय दहिवडी शहरात होत असलेल्या विकास कामांमुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
मंत्री जयकुमार गोरे हे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पदाचा कार्यभार उत्कृष्टरित्या सांभाळत असताना नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.नीलम अतुल जाधव यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा होत आहे.यामुळे या सभेत मंत्री गोरे काय बोलणार याकडे राज्यसह उद्या सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.


