आरोग्य व शिक्षणग्रामसभाजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक
Trending
मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते दहिवडी शहरात झाला विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा !
वृत्त दि. – रविवार,१३ जुलै २०२५
वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.
ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री, तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील, माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये १५ कोटी ६६ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन रविवार १३ जुलै रोजी रात्री ७ ते ९ वाजताचे दरम्यान दहिवडीत मोठ्या उल्हास पूर्ण वातावरणात पार पडले.यानिमित्ताने मंत्री श्री.गोरे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने; नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.निलम अतुल जाधव यांच्या संकल्पनेतून भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर, मंत्री श्री. गोरे यांचा भव्य सत्कार समारंभ व जाहीर सभा स्वाती मंगल कार्यालय येथे रात्री ९ ते १० या वेळेत पूर्ण झाली.
याविषयी अधिक माहिती अशी की, १४ वा वित्त आयोग मुलभूत अनुदान या योजनेतून नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेत व्यापारी संकुल (टप्पा १ तळघर आणि तळमजला) बांधकाम करणे,माझी वसुंधरा २.० व ३.० अंतर्गत विविध विकासकामे करणे,सर्वसाधारण रस्ता अनुदान सन २०२१-२२,२०२२-२३ व २०२३-२४ यामधून रस्त्यांची एकूण सहा कामे करण्यात येत आहेत. यामध्ये प्र.क्र.२ येथील शिंगणापूर रोड ते बबन सावंत घरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे, प्र.क्र.१७ येथील गोंदवले रोड ते एच.पी. पेट्रोल पंप मागील रस्ता डांबरीकरण करणे, प्र.क्र. ४ मध्ये जाधव वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, प्र. क्र.१ मधील जगदीश जाधव घर ते कोकरे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे, प्र.क्र.६ मधील सरकारी दवाखाना ते डॉ.काशिद यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्र. क्र.१२ कोळेकर वस्ती ते शिंदे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे,स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत दहिवडी नगरपंचायत अंतर्गत गांधीनगर येथील सामुदायिक शौचालय दुरुस्ती करणे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी २.० मधील शहर स्वच्छता कृती आराखडा या योजनेतून एकूण चार विकास कामे करण्यात येत आहेत. यामध्ये विकासनगर येथे सामुदायिक शौचालय बांधकाम करणे,नगरपंचायत जागेत सार्वजनिक शौचालय बांधणे, विकास सोसायटी शेजारी सार्वजनिक शौचालय बांधणे, नगरपंचायत मालकीच्या जागी सार्वजनिक मुतारी बांधणे.
तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्र.क्र.६,७,९,११ व १५ इत्यादी प्रभागांमध्ये अंतर्गत रस्ते, गटर व परिसर सुशोभीकरण करणे, प्र.क्र.५ मध्ये सिद्धनाथ व्यायाम शाळा बांधणी, प्र.क्र.१३ मध्ये सातारा रोड ते प्रियदर्शनी डेअरी रस्ता डांबरीकरण करणे, प्र.क्र.१७ मध्ये मार्केट कमिटी कडून काटकर वस्ती साळुंखे वस्तीकडे साकव करणे, प्र.क्र.१ मध्ये टेंबरे वस्ती ते शिंदेमळा रस्ता डांबरीकरण करणे, प्र.क्र.१ मध्ये शिंदेमळा रोड ते अमोल शिंदे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, प्र.क्र.२ जुना शिंगणापूर रस्ता ते हिंगळकर वस्ती डांबरीकरण करणे, प्र.क्र.२ फलटण रोड ते किर्वे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे याशिवाय मायणी रोड मोरेमळा ते काटकर वस्ती, साळुंखे वस्ती रस्ता सुधारणा करणे तसेच दहिवडी नगरपंचायत अंतर्गत दरेकर वस्ती ते कटपाळे वस्ती रस्ता कॉंक्रीट करणे आणि घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामे करणे आदी सर्व कामांचे भूमिपूजन मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.या विकास कामांचा शुभारंभ म्हणून श्रीफळ फोडण्याचा सन्मान स्थानिक महिला व प्रतिष्ठित नागरिकांना देण्यात आला.
या ठिकाणी प्रत्येक प्रभागातील स्थानिक नगरसेवक तसेच प्रतिष्ठित नागरिक,महिला यांचेसह स्थानिक जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.दहिवडी शहरात होत असलेल्या विकास कामांमुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे. या विकास कामांच्या उद्घाटन शुभारंभ झाल्यानंतर ना.जयकुमार गोरे हे स्वाती मंगल कार्यालय दहिवडी येथे जाहीर सभेसाठी रवाना झाले.
यावेळी प्रत्येक प्रभागातील स्थानिक नगरसेवक व जनतेसोबत,भाजपा कार्यकारणी सदस्या सौ.सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब),मा.जिल्हा परिषद सदस्य अर्जुन (तात्या) काळे,मा.जिल्हा परिषद सदस्य,श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), ज्येष्ठ नेते भास्करराव गुंडगे (काका), भाजपा कार्यकारणी सदस्य डॉ.संदीपदादा पोळ, मा.जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे,बाळासाहेब सावंत,सोलापूर जिल्हा परिषद मा.सदस्य शरद (बापू) मोरे,मा.सभापती अतुलदादा जाधव, आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे, दहिवडी मंडल भाजपा अध्यक्ष गणेश सत्रे,म्हसवड मंडल भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड, दहिवडी नगरीच्या नगराध्यक्ष सौ.नीलम अतुल जाधव,दहिवडी नगरपंचायत मुख्यअधिकारी संदीप घाडगे,नगरसेविका सुरेखाताई पखाले,उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे,दहिवडी नगरपंचायत बांधकाम सभापती उज्वला अमर पवार, दहिवडी नगरपंचायत स्वच्छता आरोग्य सभापती महेश जाधव, सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय काका गांधी,मा.नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक धनाजी जाधव, दिलीप (भाऊ) जाधव , सतीश जाधव, शरददादा जाधव, युवानेते सिद्धार्थ गुंडगे,संदीप जाधव,विजय जाधव, दत्तात्रय देशमाने, महेश कदम, समीर (बापू) जाधव,नगरसेवक रुपेश मोरे, शैलेश खरात,महेंद्र जाधव,नगरसेविका मोनिका गुंडगे, वर्षाराणी विलास सावंत, विजया रवींद्र जाधव, राणीताई अवघडे,सुरज गुंडगे,
लक्ष्मणराव जाधव, दत्तात्रय अवघडे, सुधीर जाधव,युवमोर्चा अध्यक्ष विशाल घोरपडे, प्रकाश वायदंडे यांच्यासह दहिवडीचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी मान्यवर,आयडियल मित्र मंडळाचे सदस्य दहिवडी को-ऑपरेटिव्ह कर्मचारी वर्ग, दहिवडी नगरपंचायत नगरअभियंता प्रणोलकुमार खताळ,अधिकारी कर्मचारी वर्ग व दहिवडी नगरीतील नागरिक माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





