आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामसभाजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयविशेषसंपादकीयसामाजिक

महापुरुषांचे विचार आचरणात आणावेत ; मंत्री जयकुमार गोरे यांचे दहिवडीकरांना जाहीर सभेतून आवाहन !

वृत्त दि. – रविवार,१३ जुलै २०२५

वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.


      ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील,माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये १५ कोटी ६६ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन रविवार १३ जुलै रोजी रात्री ७ ते ९ वाजताचे दरम्यान मोठ्या उल्हास पूर्ण वातावरणात पार पडले.मंत्री श्री.गोरे यांच्या प्रति ‌कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने; नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.निलम अतुल जाधव यांच्या संकल्पनेतून भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर, मंत्री श्री.गोरे यांचा भव्य सत्कार समारंभ व जाहीर सभा स्वाती मंगल कार्यालय येथे रात्री ९ ते १० या वेळेत पूर्ण झाली.



      यावेळी ना.जयकुमार गोरे म्हणाले,विकासाचे काम आता खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे. दहिवडीच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक,शेखर गोरे यांचे समर्थक सर्वानी साथ दिली. त्यामुळे दहिवडीमध्ये भाजपची सत्ता आली.सत्ता असो वा नसो प्रत्येक गावासाठी विकास निधी आत्तापर्यंत दिला आहे. शहरातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. माण-खटावच्या पाण्याला कोणताही कायदा आडवा येणार नाही.गरज पडली तर कायदा बदलू.तालुक्यातील इंच न इंच शेती भिजणार आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


    शहराचा विकासाचा बँकलॉग भरून काढणार; माणच्या शेतक-यांची इंच न इंच जमीन भिजली जाईल, असे पाण्याचे नियोजन केले आहे तसेच दहिवड़ी ही मतदार संघाची राजधानी आहे. याचा विचार करुन विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी मागेल तेथे काम दिले जाईल,फक्त कामे दर्जेदार करा,अशा सूचना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्या. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा दहिवडीमध्ये उभारला जाईल,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


     तसेच रिलायन्स पेट्रोल पंप ते गोंदवले रोड रस्ता दुभाजक,रस्ता सुशोभीकरण,मोठी स्मशानभूमी,अग्निशमन केंद्र व वाहनासाठी निधी आणि मार्डी चौकात शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी येत्या दीड वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी देऊन शहराचे चित्र बदलण्याच्या दृष्टीने विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवर पदाधिकारी व नागरिकांना दिला.



    ना.गोरे पुढे म्हणाले,दहिवडीमध्ये महापुरुषांच्या नावाने चौकाचौकात बोर्ड लावण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. महापुरुषांना जाती पातीच्या चौकटीत अडकवू नका ! दहिवडीमधील सर्व बोर्ड काढून टाकू या. युगपुरुषांच्या ,महापुरुषांच्या विचारांचे आदर्श आणि कार्ये ही सर्वासाठी प्रेणादायी आहेत. महापुरुषांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. त्यांना जाती पातीमध्ये आपण अडकवून न ठेवता, युगपुरुषांचे,महापुरुषांचे आदर्श विचार आचरणात आणून ताकत व प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करू या,असे आवाहन त्यांनी केले.



      यावेळी नगराध्यक्षा नीलम जाधव म्हणाल्या, आपण सर्वजण मिळून दहिवडीच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करूया.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा,अग्निशमन गाडी,स्मशानभूमी यासह शहराच्या सुशोभीकरणासाठी मदत करावी. राज्यामध्ये ना.जयकुमार गोरे यांनी अलौकिक कार्य केले. वारी निमित्त स्वच्छता केली.त्याचबरोबर पंढरीच्या वारीचे योग्य नियोजन केले. वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अभिनंदनाचा ठराव ही विधानसभेत झाला. ही बाब माणच्या माणसाला गौरवावास्पद आहे.नामदार जयकुमार गोरे यांनी शहराच्या विकासासाठी मोठा निधी दिला असल्याचेही त्या म्हणाल्या.



    या सभेचे प्रास्ताविक ज्येष्ठ नेते,माजी शिक्षण व अर्थ सभापती ॲड.भास्करराव गुंडगे उर्फ काका यांनी केले.ते म्हणाले,शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये जवळपास ५० लाखाहून अधिकचा विकास निधी हा ना.जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून मिळाला आहे. दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण आहे आणि ते विकास कामांमध्ये आग्रेसर राहिले पाहिजे,५० कोटीहून अधिक रकमेची पाणीपुरवठा योजनेचे कामे चालू आहे.जेणेकरून नकाशावरती दहिवडी शहर हे एक उत्कृष्ट शहर झालं पाहिजे,अशी मंत्री साहेबांची भूमिका आहे.


       सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून आपण सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी किंबहुना ग्रामविकास खात्याच्या मार्फत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ग्रामविकासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. आषाढी वारीच्या नियोजनासाठी मंत्री गोरे यांनी जवळपास दोन महिने रात्रंदिवस मेहनत घेतली.पालखीतळासाठी मुक्कामी असण्याच्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे मंडप उभा करण्याचे काम केल्यामुळे तमाम वारकरीही श्री. गोरे यांना दुवा देत आहेत.आषाढीवारी पूर्वीचं पंढरपूर स्वच्छता मोहीम पूर्ण ‌ करून स्वच्छतेबाबतीत लोकजागृती केली.आषाढी वारीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नामदार गोरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कौतुक केले आहे.शहराला भरीव प्रमाणात विकास निधी दिल्याबद्दल तमाम दहिवडीकरांच्यावतीने ॲड.गुंडगे यांनी मंत्री गोरे यांचे आभार व्यक्त करून आपल्या प्रास्ताविकाची सांगता केली.


    यावेळी भाजपा कार्यकारणी सदस्या सौ.सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब), मा.जिल्हा परिषद सदस्य अर्जुन (तात्या) काळे,मा.जिल्हा परिषद सदस्य, श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), ज्येष्ठ नेते भास्करराव गुंडगे (काका), भाजपा कार्यकारणी सदस्य डॉ.संदीपदादा पोळ, मा.जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे,बाळासाहेब सावंत,सोलापूर जिल्हा परिषद मा. सदस्य शरद (बापू) मोरे,मा.सभापती अतुलदादा जाधव, आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे, दहिवडी मंडल भाजपा अध्यक्ष गणेश सत्रे, म्हसवड मंडल भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड, दहिवडी नगरीच्या नगराध्यक्ष सौ.नीलम अतुल जाधव, दहिवडी नगरपंचायत मुख्यअधिकारी संदीप घाडगे, नगरसेविका सुरेखाताई पखाले, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे,दहिवडी नगरपंचायत बांधकाम सभापती उज्वला अमर पवार, दहिवडी नगरपंचायत स्वच्छता आरोग्य सभापती महेश जाधव, सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय काका गांधी, मा. नगराध्यक्ष धनाजी जाधव, दिलीप (भाऊ) जाधव , सतीश जाधव, शरददादा जाधव, युवानेते सिद्धार्थ गुंडगे,संदीप जाधव,विजय जाधव, दत्तात्रय देशमाने, महेश कदम, समीर (बापू) जाधव,नगरसेवक रुपेश मोरे, शैलेश खरात,महेंद्र जाधव,नगरसेविका मोनिका गुंडगे, वर्षाराणी विलास सावंत, विजया रवींद्र जाधव, राणीताई अवघडे,सुरज गुंडगे,लक्ष्मणराव जाधव, दत्तात्रय अवघडे, सुधीर जाधव,युवमोर्चा अध्यक्ष विशाल घोरपडे, प्रकाश वायदंडे यांच्यासह दहिवडीचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी मान्यवर, आयडियल मित्र मंडळाचे सदस्य दहिवडी को-ऑपरेटिव्ह कर्मचारी वर्ग, दहिवडी नगरपंचायत नगरअभियंता प्रणोलकुमार खताळ,अधिकारी कर्मचारी वर्ग व दहिवडी नगरीतील नागरिक माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.