आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताग्रामसभाजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक
Trending

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त; दहिवडी नगरपंचायततर्फे वृक्षारोपण तर नगराध्यक्षांकडून शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप…

वृत्त दि.- मंगळवार, २२ जुलै २०२५

वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.


    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहिवडीत नगराध्यक्षा सौ.नीलम अतुल जाधव यांच्या संकल्पनेतून नगरपंचायततर्फे वृक्षारोपण करण्यात आले तर नगराध्यक्षांकडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.



    हे वृक्षारोपण नगरपंचायत हद्दीत विठोबाचा माळ परिसरात आंबा,जांभूळ,वड,पिंपळ व कडूलिंब यांसारख्या झाडांची १०० रोपे लावून करण्यात आले तसेच यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले. या वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्याचे वाटप मा.जिल्हा परिषद सदस्य,श्री.सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे,बाळासाहेब सावंत,मा.सभापती अतुलदादा जाधव,नगरसेविका सुरेखाताई पखाले,नगरसेवक रुपेश मोरे,लक्ष्मणराव जाधव,विजय जाधव, सुभाष खाडे,संदीप जाधव,जोतीराम जगदाळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



 ‌     यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप घार्गे म्हणाले, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…’ असा संदेश संत तुकाराम महाराज यांनी दिला आहे. हाच वारसा जपण्यासाठी ‘नगरपंचायततर्फे’ वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प केला आहे.प्रत्येकाला जगण्यासाठी प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची गरज असते आणि तो देण्याचे काम झाडे म्हणजेच वृक्ष करत असतात, हे सर्वांनाच मान्य आहे. मात्र, शहरीकरणाच्या नादात अनेक ठिकाणी झाडे तोडली जातात आणि प्रदूषण वाढीला वाव मिळतो. त्याचा कळत-नकळतपणे सर्वांवर परिणाम होतो. त्यापासून वाचण्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे. याबाबत संत ज्ञानेश्‍वर माउली असोत की जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज या सकल संतांनी निसर्गाचे अर्थात झाडांचे महत्त्‍व अधोरेखित केले आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून या वृक्षारोपण कार्यक्रमाचा “श्री गणेशा” केला आहे.


        यावेळी यावेळी नीलम जाधव म्हणाल्या, ‘निसर्गाचे व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो’, या भावनेतून ‘वृक्षारोपण आणि संवर्धनाचा’ वसा घेतला आहे. त्यासाठी नगरपंचायतीची साथ लाभली आहे.याबद्दल त्यांनी नगरपंचायतीचे आभार मानले. केवळ वृक्षारोपण करायचे नसून,त्याचे संगोपन व संवर्धनही केले जाणार आहे. त्यासाठी नैसर्गिक खत,पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जनावरांपासून संरक्षणासाठी प्रत्येक रोपाची निगा राखली जाणार आहे.



      “लहान मुले ही देवघरची फुले आहेत ” आणि जेव्हा त्यांना एखादी वस्तू किंवा साहित्य असो अथवा खाऊ असो हे त्यांना अचानकपणे प्राप्त झाल्यास त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मितहास्य निर्माण होते. त्यावेळी त्या कोवळ्या मुलांना भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तींना सुध्दा मनोमन आत्मीय समाधान मिळते. या भावनेतून मा.मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,आपला आनंद लहान मुलांना सोबत घेऊन द्विगुणित करावा याच मुख्य हेतूने प्रेरित होऊन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, असे बोलून नगराध्यक्षांनी आपल्या मनोगताची सांगता केली.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.