आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामसभाजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक
Trending

नागपंचमीनिमित्त दहिवडीत महिला मेळाव्याचे आयोजन ! नागपंचमी होणार उत्साहात साजरी…

वृत्त दि.- 28 जुलै 2025

वृत्त – दहिवडी, ता.माण,जि.सातारा.


   श्रावण मासाला प्रारंभ झाला की सर्व सणांची आनंदाने सुरुवात होते. श्रावण मासातील पहिला सण म्हणजे नागपंचमी होय. या उत्साही सणात नागदेवता,वारुळाची पूजा करून पाठीराख्यासारख्या नागदेवतेला ओवाळणी घालताना महिला दिसतात.नागपंचमी सणात सकाळपासून उपवास,दुपारी नागदेवतेची पूजा केली जाते.यासाठी महिला नागदेवतेच्या मंदिरात जातात,वारुळरुपी मंदिराचा शोध घेऊन पूजाअर्चा केली जाते किंवा परंपरेनुसार एक दिवसीय नागदेवतेची प्रतिष्ठापना करून त्या ठिकाणी गोड धोड नैवेद्य दाखवूनकरून पुजा – अर्चा केली जाते.



      या पार्श्वभूमीला अनुसरून,सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरात माणगंगा नदी किनारी, जुन्या दहिवडी – शिंगणापूर रस्त्यालगत श्री नागदेवता व नागदेवी यांची परंपरागत एक दिवसीय प्रतिष्ठापना दहिवडी शहर नाभिक समाज बांधवांकडून ‌केली जाते. विधीवत पूजाअर्चा झाल्यानंतर पुरणपोळी,दिंडे व लाह्या अशा प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो व सायंकाळी आरती झाल्यानंतर या मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात येते.


       यावर्षी नागपंचमी मंगळवार दि.२९ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या नागपंचमी सणाचे औचित्य साधून‌ दहिवडी नगरपंचायत दहिवडी यांनी नगराध्यक्षा सौ. नीलम अतुल जाधव यांच्या नेतृत्वात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे.याबद्दल अधिक माहिती देताना सौ.जाधव म्हणाल्या,भारतीय संस्कृतीत विविध सण,परंपरा समाजाला एकत्रीत बांधतात.यातूनच एका अनामिक आस्थेने चालत आलेल्या व चांगुलपणावर आधारलेले अनेक सण व परंपरा आपण गेली कित्येक वर्ष जपत आलेलो आहोत.



     या परंपरेचे पाईक होत असताना नागपंचमी ‌ या सणाचे औचित्य साधून परिसरातील महिला वर्गाला प्रफुल्लित करण्याच्या उद्देशाने “महिला मेळावा” आयोजित केला आहे. यामध्ये सांस्कृतिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता सुरू होणारा “होम मिनिस्टर” हा कार्यक्रम या नागपंचमी सणाचे आणि या महिला मेळाव्याचे विशेष आकर्षण असणार आहे.



   तसेच एकेकाळी गावगाडयात भल्लरीगीत,जात्यावरील ओव्या,शेतकरी गीत,पिंगळा,वासुदेव या गाण्यांनी गावची पहाट सुंदर व्हायची ही सुरावट गाणा-या व पारंपारिकता जपणा-या मायमाऊली आपल्या गावात परिसरात असतील त्यांनाही या सणासाठी आवर्जून उपस्थित रहावे.


     तरी या नागपंचमी सणास जास्तीत जास्त महिला भगिनींनी सहभागी व्हावे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबातील मायमाऊली सौभाग्यवती यांना या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा द्यावी, असे विनम्र आवाहन सौ.जाधव यांनी केले आहे.


     या महिला मेळाव्याबद्दल परिसरामध्ये कुतूहलात्मक आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नागपंचमी सणादिवशी दहिवडी शहरात अशा प्रकारचा कार्यक्रम इतिहासात पहिल्यांदाच होत असल्याने नगरपंचायत दहिवडी आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे परिसरात कौतुक होत आहे.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.