आरोग्य व शिक्षणजिल्हाताज्या घडामोडीविशेषसामाजिक
Trending
ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, वडूज येथील विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद ! बालचमूंच्या प्रयोगशील कृतीचे पालकांकडून कौतुक…
वृत्त – वडूज,ता.खटाव,जि.सातारा.
वडूज येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषेला प्राधान्य दिले जात आहे.विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासाठी त्यांच्यात विज्ञानाची आवड निर्माण करून त्यांना कायम प्रयोगशील व कल्पक बनवण्याकडे गुरूजनांचे लक्ष असते.या हेतूने स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनात पीस हाऊस,हार्मोनी हाऊस,इंटेग्रिटी हाऊस,विस्डम हाऊस मधील सर्व विद्यार्थ्यांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला होता.
ट्रिनिटी स्कूलच्या मार्गदर्शिका हर्षदा देशमुख-जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. रुपाली धामधरे यांचेहस्ते मुख्याध्यापिका मृदुला बॅनर्जी,सुरज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.याप्रसंगी अस्मिता भांडारी, माधुरी शिंदे, वैष्णवी गाढवे,सर्व शिक्षक,सेवक,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक प्रेरणादायी गीत व नृत्याचे सादरीकरण केले.सौ.सोनाक्षी विजय इंगोले यांनी विज्ञानाचे महत्व सांगतिले.
या प्रदर्शनात पीस हाऊस मधील शिक्षक बसंती पोळ,शाईन द्रविड,पल्लवी बागल, हार्मोनी हाउस मधील शिक्षक रुपाली कदम,अनिसा मनेर,सुनीता काटकर,अमोल वानखेडे ,इंटेग्रिटी हाऊस मधील शिक्षक आशालता चव्हाण,संध्या कुंभार,राहुल रघुनाथ,शिल्पा कर्णे,विस्डम हाऊस मधील शिक्षक भूषण मोरे,योगिता देशमुख,चैताली शिंदे, प्राजक्ता ओंबासे,प्रि-प्रायमरी – विज्ञान प्रदर्शनात प्राजक्ता ओंबासे,सुनिता काटकर,शिल्पा कर्णे, ब्रेनी स्पार्क (फाउंडेशन ग्रुप) मधील शिक्षक चैताली शिंदे, योगिता देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले होते.यावेळी विविध मान्यवर,पालक,शिक्षक सेवकवर्गांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सूत्रसंचालन कु.श्लोका गांधी हिने करून आभार मुख्याध्यापिका मृदुला बँनर्जी यांनी मानले.
सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे उपकरणांची मांडणी करून विविध प्रयोग सादर केले होते.या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण दिले जात असून याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात निश्चितच होणार आहे.
– सौ.हिंदवी गुंजवटे,पालक
या प्रदर्शनासाठी आम्हाला आमच्या मार्गदर्शिका हर्षदा देशमुख-जाधव दिदी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असून सर्वच शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करत हा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे.पालकवर्गांनीही चांगला
प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
– मुख्याध्यापिका मृदला बँनर्जी ,ट्रिनीटी इंटरनॅशनल स्कूल वडूज




