आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामसभाजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयविशेषसामाजिक
Trending

दहिवडीत होणार भव्य रसायनशास्त्र प्रयोगशाळा ! दहिवडी कॉलेज दहिवडी मध्ये झाले विविध विकास कामांचे भूमिपूजन…

वृत्त दि. – शुक्रवार, ८ ऑगस्ट २०२५

वृत्त – दहिवडी, ता. माण, जि.सातारा.


         सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याची शिक्षणगंगा म्हणून ओळख असलेल्या दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत रसायनशास्त्र प्रयोगशाळा इमारतीच्या बांधकामाची भूमिपूजन समारंभ व बॅडमिंटन कोर्ट,ओपन जिम,अध्यायावत वर्ग खोल्या,संगणक प्रयोगशाळा यांचे उद्घाटन शुक्रवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १२ – १५ मी. वाजता उल्हास पूर्ण वातावरणात पार पडले.


     या कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते आणि संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील जाधव व अजित पवार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नंदकुमार खोत, तानाजी मगर, सुरेंद्र मोरे विशाल पोळ, उदय जगदाळे, विलासराव शिंदे, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय खेत्रे, उपप्राचार्य डॉ.डी बी जाधव,उपप्राचार्या देठे मॅडम ,उप – प्राचार्य विष्णू म्हस्के, वानिज्य विभाग प्रमुख प्रा. एम.एन.म्हेत्रे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख एम.जे.लुबाळ, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.दिलीप अनुसे आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह पत्रकार रुपेश कदम, उमेश बुधावले, प्रवीण राजे, नवनाथ भिसे, चैतन्य काशिद आदी उपस्थित होते.



     यावेळी श्री देशमुख म्हणाले, “महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांसाठी अनुभवी प्राध्यापक, अद्यावत इमारती,उत्तम साहित्य या ठिकाणी आणले जात आहे.”


    श्री देशमुख महाविद्यालयात होत असणाऱ्या भव्य रसायनशास्त्र प्रयोगशाळेबद्दल बोलताना यापुढे म्हणाले, मानवी जीवनमान सुधारण्यासाठी रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे खूप महत्त्व आहे. येथे, विद्यार्थी सिद्धांत शिकण्यासोबतच व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्ये देखील मिळवतात.प्रयोगशाळेतील अनुभवामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते.‌ प्रयोगशाळेत काम करताना, विद्यार्थ्यांना उपकरणे हाताळणे, सुरक्षितता पाळणे आणि प्रयोग करण्याची कौशल्ये मिळतात. प्रयोग करताना येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना विचार करण्याची आणि उपाय शोधण्याची संधी मिळते. प्रयोगशाळेतील अनुभवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो आणि ते जगाकडे अधिक चिकित्सक दृष्टीने पाहू लागतात. प्रयोगशाळेतील संशोधनामुळे विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळते आणि ते विज्ञानाच्या पुढील अभ्यासासाठी तयार होतात. प्रयोगशाळेत काम करताना, विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्त्व समजते आणि त्यांना जबाबदारीने वागण्याची सवय लागते. रसायनशास्त्र प्रयोगशाळांमुळे नवीन संशोधने आणि शोधांना चालना मिळते, ज्यामुळे वैज्ञानिक प्रगती शक्य होते.



      रसायनशास्त्र प्रयोगशाळेत तयार झालेले ज्ञान आणि तंत्रज्ञान,उद्योग आणि आरोग्य या सर्व बाबी समाजाच्या विकासासाठी उपयोगी ठरतात. अन्न, औषधे, प्लास्टिक, खते, रंग, आणि इतर अनेक उत्पादने रसायनशास्त्र प्रयोगशाळेतील संशोधनामुळेच शक्य झाली आहेत. रसायनशास्त्र प्रयोगशाळा शिक्षण आणि संशोधनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. महाविद्यालयातील या सुविधेचा लाभ घेऊन या महाविद्यालयातून भविष्यातील शास्त्रज्ञ घडवतील, असा दृढ विश्वास व्यक्त करून त्यांनी आपल्या मनोगताची सांगता केली.



     विकास देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील या महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तेने वेगळी ओळख निर्माण केली आहे या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पदाधिकारी व कर्मचारी नेहमीच प्रयत्नशील आहे.



    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर कुंभार यांनी केले, इंद्रजीत ऐवळे यांनी सूत्रसंचालन केले तर वैशाली खाडे यांनी आभार मानले.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.