आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामसभाजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक
Trending
माण तालुक्यात झाले नशामुक्त भारत अभियान ! दहिवडी कॉलेजच्या अंकिता अवघडे ने पटकावला प्रथम क्रमांक
वृत्त दि.- १५ ऑगस्ट २०२५
वृत्त – दहिवडी, ता.माण, जि.सातारा
मा.विशेष पोलीस महानिरीक्षक अँन्टीनार्कोटिक्स टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व नामांकित शाळा महाविद्यालयांमध्ये नशा मुक्त भारत हे अभियान राबवले होते.
या अभियानांतर्गत दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नशा मुक्त भारत अभियानांतर्गत दहिवडी कॉलेज दहिवडी येथे प्राचार्य डॉ. संजय खेत्रे यांच्या नियोजनानुसार, बुधवार दि.१३ ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन दहिवडी महाविद्यालयात करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत दहिवडी कॉलेजची विद्यार्थिनी अंकिता राजाराम अवघडे ने प्रथम क्रमांक मिळवला, आरती मारुती सावंत ने द्वितीय क्रमांक मिळवला तर श्रावणी अमृत शेलार ने तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेतील विजेत्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे, नगराध्यक्षा निलम अतुल जाधव, श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे, माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे आदींच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याविषयी अधिक माहिती अशी की, सध्याच्या गतिमान युगामध्ये विद्यार्थ्यांनी फेसबुक, इन्स्टाग्रामच्या युगात चंगळवादाला प्राधान्य देऊन अफ्फू, चरस, गांजा, गुटखा, दारू, बिडी, सिगरेट या अन् अशा बऱ्याच प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जाऊन एखाद्याची आयुष्य क्षणभंगुर सुखासाठी सहजचुकीने उध्वस्त होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे आणि स्वतःला आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न करावे, या उदात्त उद्देशाने दहिवडी पोलीस स्टेशन व परिसरातील सर्व शैक्षणिक आस्थापना यांच्या संयुक्त विद्यमानाने “व्यसनमुक्ती” या विषयावरती निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या निबंध स्पर्धेत दहिवडी कॉलेज, महात्मा गांधी विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, परशुराम शिंदे कन्या विद्यालय इत्यादी मधून एकूण ६५ पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दहिवडी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांनी विद्यार्थ्यांना असे आवाहन केले की, क्षणिक सुखाचा आनंद घेण्यासाठी छोट्या मोठ्या व्यसनांना सामोरे जाऊन स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करू नका.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.विष्णू मस्के,उपप्राचार्य बी.डी.जाधव, उपप्राचार्य डॉ मीरा देठे, प्रा अमर जाधव,प्रा मारुती ढाणे,प्रा. इंद्रजीत ऐवळे, प्रा किरण पवार पोलीस दलातील श्री रामचंद्र गाढवे,श्री सुहास गाडे,श्री विजय खाडे उपस्थित होते.




