आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामसभाजिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयविशेषसंपादकीयसामाजिक
Trending

विजयसिंह देशमुख यांची जंगी मिरवणूक ! आय ए एस पदी बढती मिळाल्याबद्दल लोधवडेरांकडून भव्य सत्कार सोहळा

वृत्त दि.- शनिवार,16 ऑगस्ट 2025

वृत्त – लोधवडे, ता.माण,जि.सातारा


      सातारा जिल्ह्यात; माण तालुक्यातील, लोधवडे गावाचे सुपुत्र विजयसिंह देशमुख यांना भारतीय प्रशासकीय सेवेत बढती मिळाली तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती झाली. याबद्दल लोधवडेकर ग्रामस्थांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून शनिवार,दि.१६ ऑगस्ट रोजी विजयसिंह देशमुख यांचा सपत्नीक सत्कार केला.



       या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने हनुमान मंदिरासमोरील व्यासपीठावर सकाळी १०-३० मि. ते दुपारी १२-३० मि. वाजता ह.भ.प. हनुमंत महाराज घार्गे यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर श्री देशमुख यांचा सत्कार समारंभ झाला.


        प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत, लोधवडेसह माण तालुक्यातील विविध सेवाभावी संस्था,राजकीय संस्था,प्रशासकीय आस्थापना,धार्मिक संस्था,शैक्षणिक संस्था,क्रीडा मंडळे तसेच महिला मंडळे,गणेश मंडळे यांनी उस्फूर्तपणे विजयसिंह देशमुख यांचा सपत्नीक सत्कार करून सन्मान केला.



     यावेळी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले, विजयसिंह देशमुख यांना महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविले आहे. प्रांताधिकारी,उपजिल्हाधिकारी,अतिरिक्त विभागीय आयुक्त या पदांवर त्यांनी उत्तम काम केले आहे. प्रशासनात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण होईल असं काम त्यांनी केलंय याचा मला आनंद आहे. समाजातील शेवटच्या माणसाला आपल्या पदाचा कसा उपयोग होईल यासाठी ते सदैव कार्यरत राहतील याची मला खात्री आहे.



      विजयसिंह यांची आय ए एस पदोन्नती शिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरती संचालक पदी नियुक्ती झाली आहे. त्या त्या भागातील सर्व समाज विधायक काम करण्यासाठी त्यांना विशेष अधिकार मिळाले आहेत. या सर्व अधिकारांचा वापर करून समाजातील तळागाळातील शेवटच्या गरीब माणसाबद्दल कळवळा, सहानुभूती ठेवून त्याला अधिकचा वाटा कसा मिळेल ? याचा ते भविष्यकाळात पुरेपूर प्रयत्न करतील आणि त्यांनी तो करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. यापुढे ते म्हणाले, आपण ज्या मातीतून जन्माला आलो, ज्या गावातून आलो त्या मातीला, त्या गावाला अभिमान वाटेल असं कर्तुत्व पुढच्या पिढीने करावं करावं,अशी अपेक्षा व्यक्त केली. यांच्यातून प्रेरणा घेऊन आपल्या गावातील मुलांनी विशेषत: मुलींनी आयएएस व्हावं आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या पालकांनी पुरेपूर मदत करावी. विजयसिंह यांनी एक चांगली वाट, कर्तुत्वाची वाट गावाला दाखवून दिली आहे. ती वाट अधिक मोठी व्हावी, मोठ्या संख्येने गावातील मुले आयएएस व्हावीत आणि याशिवाय भविष्यकाळामध्ये त्यांनी आई-वडिलांनाही विसरू नये,अशीही अपेक्षा व्यक्त केली. सत्कारमूर्ती विजयसिंह यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन, यापुढील वाटचालीमध्ये अधिक काम आणि कर्तृत्व त्यांच्या हातून घडावं, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी आपल्या मनोगताची सांगता केली.



      सत्काराला उत्तर देताना विजयसिंह देशमुख म्हणाले, गावचा सत्कार झाल्याशिवाय कोणताही सत्कार स्वीकारायचा नाही हे मी ठरवलं होतं. कारण ज्या गावाने माझ्यावर मनापासून प्रेम केलं त्यांचा सत्कार माझ्यासाठी अनमोल आहे. अगोदरच्या पिढीने काबाडकष्ट केले, मात्र आमच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. शिकणं महत्वाचं आहे हे त्यांनी जाणले त्याचेच हे फलित आहे. मला मिळालेल्या संधीचा सर्वसामान्य माणसासाठी जास्तीत जास्त उपयोग व्हावा, याचा प्रयत्न करेन. उपस्थित महिला वर्गाला संबोधित करताना ते पुढे म्हणाले, ज्याप्रकारे आम्हाला आमच्या आईने घडवलं तसंच तुम्हीही तुमच्या मुलांना घडवा, शिक्षण प्रवाहात आणा आणि त्यांचे भविष्य घडवा. यावेळी पाऊस यायला सुरुवात झाल्याने, त्यांनी आपले मनोगत आवरते घेऊन मनोगत याची सांगता केली.



     सत्कार समारंभानंतर दहीहंडी फोडून झाल्यावर, गोपाल कृष्ण यांच्या प्रतिमेची पूजन करून त्यांची पालखी प्रदक्षिणा आणि त्याचबरोबर विजयसिंह देशमुख यांची सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मधून सपत्नीक जंगी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत गावातील ग्रामस्थ विशेषतः महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी शंकरराव देशमुख, डॉ. स्वाती देशमुख, उत्पादन शुल्क अधिकारी अमोल जाधव, सरपंच निवास काटकर, उपसरपंच वैशाली देशमुख, माजी सरपंच शामराव पवार व‌ दिलीप चव्हाण, दादासाहेब चोपडे, दिव्यांग सेल उपाध्यक्ष शिवाजी काशिद, वसंतराव कदम, सचिन जाधव, कुंडलीक चोपडे,अविनाश कदम, संजय मगर, दिपक कदम, सुनील पवार,अजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश जाधव, सूत्रसंचालन रामदास जाधव व आभार प्रदर्शन दीपक कदम यांनी केले. या कार्यक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले.

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.