ताज्या घडामोडी
Trending

साखर उद्योगातील उत्कृष्ट संशोधनामुळे श्री.काकरला गंगाधरम हे प्रतिष्ठेच्या ‘श्री मैदूर आनंद सुवर्णपदक पुरस्काराने सन्मानित !

वृत्त – महाराष्ट्र.


    वसंतदादा साखर संस्था,पुणे येथे तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले श्री.काकरला गंगाधरम यांना ‘श्री मैदूर आनंद गोल्ड मेडल अवॉर्ड’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सन्मान त्यांना दक्षिण भारतीय ऊस व साखर तंत्रज्ञ संघटना (SISSTA) यांच्या ५४ व्या वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला.


      हा पुरस्कार त्यांना २०२४ साली बेंगळुरू येथे पार पडलेल्या SISSTA च्या ५३ व्या वार्षिक अधिवेशनात सादर केलेल्या “Challenges & remedies in sugar processing during implementation of various encon measures” या संशोधनात्मक तांत्रिक प्रबंधासाठी देण्यात आला.



        संशोधन क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कार्य करून गंगाधरम यांनी साखर उद्योगातील तांत्रिक प्रगतीला चालना दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे कारखान्यांमध्ये कार्यक्षमता वाढीसोबतच साखर निर्मितीतील गुणवत्ता सुधारणेसही मदत झाली आहे.


      या सोहळ्यास श्री. संजय अवस्थी, अध्यक्ष – शुगरकेन टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (STAI), श्री. एन. चिन्नप्पन, अध्यक्ष – SISSTA यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी गंगाधरम यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



     दक्षिण भारतीय ऊस व साखर तंत्रज्ञ संघटनेच्या या पुरस्कारामुळे गंगाधरम यांचे योगदान देशभरातील साखर उद्योगासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या या यशाबद्दल साखर उद्योगातील सहकारी, सहकर्मी आणि विविध संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.