महाराष्ट्र

पूरग्रस्तांना मदतीचा हात ! महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी पाठवला भरीव किमतीचा जीवनावश्यक शिधा

 

वृत्त दि. – रविवार, ५ ऑक्टोंबर २०२५

वृत्त – दहिवडी, ता.माण,जि.सातारा.


      महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.घरांचे नुकसान,शेतीचे नुकसान,पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि आरोग्यविषयक अडचणी अशा अनेक संकटांचा सामना नागरिक करत आहेत. या कठीण काळात राज्य सरकारतर्फे नागरिकांना ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेखाली मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे.


 


    या आवाहनाला साथ देण्यासाठी, सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या इयत्ता १० वी सण १९९२-९३ ची बॅच अर्थात (MGVD group) माध्यमातून दातृत्वाचा संस्कार मुलांमध्ये रुजविण्यासाठी,या बॅचने एकत्रित येऊन एक दिवसात पूरग्रस्तांसाठी २५००० हजार रुपयांचा निधी उभारला.या निधीमधून जीवनावश्यक शिधा खरेदी केला आणि रविवार, दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील पूरग्रस्तांसाठी हा शिधा पाठवला.



      याप्रसंगी दहिवडीच्या नगराध्यक्षा सौ निलम जाधव म्हणाल्या, महात्मा गांधी विद्यालय इयत्ता दहावी १९९२-९३ च्या बॅचचे कौतुक करण्यासाठी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. या बॅचने समाजविधायक कार्यातून आपला एक वेगळा ठसा जनमानसात उमटविला आहे. समाजहिता प्रतिसंवेदनशील असणारे हे सर्व सुजाण नागरिक नियमितपणे समाजासाठी दातातृत्वाची भावना ठेवतात. मागील काही आठवड्यांमध्ये, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. महापुरामुळे शेती, फळबागा आणि घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याबरोबरच लोकांची जीवित व वित्त हानी झाली आहे.अशा आपत्तीजनिक परिस्थितीत, राज्य सरकारने “एक हात मदतीचा” असे आवाहन नागरिकांना केले. या आवाहनाला साथ देत, या एमजीव्हीडी ग्रुप ने पुढाकार घेत आपल्याकडून “फुल ना फुलाची पाकळी मदत” या भावनेने पूरग्रस्तांसाठी ‘जीवनावश्यक वस्तूंचा शिधा’ पूरग्रस्तांना पाठवला. यामध्ये फरसाणा,गुळ,खाद्यतेल, चहा पावडर,डाळ,कपड्याचा साबण,मोहरी,जिरे,पोहे,रवा,साखर आणि खोबरेल तेल इत्यादी सर्व १२ जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या.या बारा वस्तूंचे प्रत्येकी ५०० रुपयांचे एक किट बनवून अशी एकूण ५० किट धाराशिव जिल्ह्यातील बांधवांसाठी रवाना केली. यापूर्वी महात्मा गांधी विद्यालयास पिण्याच्या पाण्याची तसेच दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पिंगळी तलाव परिसरामध्ये काढलेल्या नवीन विहिरीमधून पाईपलाईन करण्यासाठी, या बॅचने एकूण २५ हजार रुपये विद्यालयास मदत म्हणून दिले होते. या बॅचच्या सर्व सामाजिक उपक्रमांचे मनापासून अभिनंदन व कौतुक त्यांनी आपल्या मनोगताची सांगता केली.



       यावेळी माण पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव म्हणाले,एम जी व्हि डी ग्रुप तर्फे सर्व मित्रमंडळींनी गोळा केलेले साहित्य सर्वांच्यावतीने परांडा येथे पाठवत आहे. त्यानिमित्ताने आज महात्मा गांधी विद्यालयाचे इयत्ता दहावी १९९२-९३ या बॅचचे आमचे सर्व मित्रमंडळी येथे उपस्थित आहेत. हा सर्व मित्रसमुह नियमितपणे अनेक सामाजिक उपक्रम करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून पूरग्रस्तांसाठी हा जीवनावश्यक शिधा पाठवत आहोत. हा शिधा गोळा करण्यासाठी आमच्या बॅचमधील जवळपास ६१ वर्गमित्रांचे सहकार्य लाभले. समाजविधायक कार्यासाठी सर्व मित्रमंडळींचे सहकार्य यापुढेही राहावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त व्यक्त केली.


         या बॅचेचे शिक्षक खाडे डी.ए. व एम.टी.मोहिते इत्यादी गुरुजन या बॅचचे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते‌. यावेळी ते म्हणाले,या बॅचने एक सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना शिधा वाटप करण्याची आदर्श कामगिरी केली आहे. या उपक्रमाला सदिच्छा देत इतरांनीही यातून प्रेरणा घ्यावी,असे गौरवोद्गार त्यांनी काढले.महात्मा गांधी विद्यालयाचे उपशिक्षक अविनाश रोमन यांनी या सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत यांच्याहातून असेच सत्कार्य होत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.


        याप्रसंगी इयत्ता दहावी १९९२-९३ च्या बॅचचे विद्यार्थी माण पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव,संजय जगदाळे, संदीप जाधव, जितेंद्र भोसले, धैर्यशील इंगळे, युवराज ढगे, सचिन चांडवले, हेमंत पोरे,सचिन माने, विजय शिंदे,संतोष देशमुख,चंद्रकांत गलंडे, पांडुरंग जाधव,संताजी गोसावी, रवींद्र जाधव, शामराव कदम,मनोहर शिंदे इत्यादी सर्व सुजाण नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवराज ढगे यांनी केले. महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामगिरीचे पंचक्रोशीसह दहिवडी परिसरात होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.