क्राईम

साताऱ्यात १३ वर्षीय छकुलीची निर्दयीपणे हत्या; आरोपीचा शासनाने चौरंगा करावा,अशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची मागणी !

वृत्त – वडूज,ता.खटाव,जि.सातारा

वृत्त दि.- गुरुवार,१६/०९/२५


      सातारा जिल्ह्यातील सासपडे येथील एका घटनेने संपूर्ण देश हादरला होता. काही दिवसांपूर्वी १३ वर्षीय आर्या सागर चव्‍हाण या शाळकरी मुलीची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राहुल बबन यादव या ३५ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पण, या प्रकरणानंतर आता संपूर्ण सासपडे गावच नव्हे तर संपूर्ण सातारा तसेच पश्चिम महाराष्ट्र पेटला आहे. १३ वर्षीय छकुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.



       समोर आलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय शाळकरी मुलगी आर्या चव्‍हाण शाळेतून आल्यानंतर तिने कुटुंबियांकडून चावी घेतली आणि ती घरात गेली. त्यानंतर ती कपडे बदलत असताना तेव्हा राहुलने घरात कोणीही नसल्याचे पाहून तो घरात शिरला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने राहुलला विरोध दर्शवला. त्यानंतर तिच्या डोक्यात जात्याने हल्ला केल्याची माहिती राहुलने पोलिसांना दिली. या प्रकरणातील आरोपी राहुल हा तिच्याच घराजवळ राहणारा असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.



      ही घटना समोर आल्यानंतर संशयित आरोपीविरोधात जनक्षोभ उसळला. संशयिताच्या घराला लक्ष्य करत जमावाने घराची तोडफोड केली. स्थानिकांनी नराधमाच्या घरावर दगडफेक करत पत्रे उचकटले. या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सासपडेसह, हरपळवाडी, गणेशवाडी या गावांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. दरम्यान, मुलीचा हत्या करणाऱ्या राहुल यादवला फाशीची शिक्षा देण्‍याची मागणी सासपडे ग्रामस्‍थांसह सातारा जिल्ह्यातही ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आले. यास अनुसरून, खटाव तालुक्यातील वडूज येथे गुरुवार, दि.१६ ऑक्टोबर रोजी सासपडे येथील झालेल्या कुकृत्याच्या निषेधार्थ आरोपीस लवकरात लवकर मृत्यूदंड देण्यात यावा व अशा प्रकारचे कृत्य समाजात परत होऊ नये, अशा असामाजिक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर शासनाची जरब बसावी,यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खटाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार व पोलिस प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले.



     यावेळी तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.झालेले कुकृत्य समाजाला काळिमा फासणारे असून अशा वृत्तीचा छत्रपती श्री शिवरायांनी ज्या पद्धतीने “चौरंगा” केला, त्याच पद्धतीने आरोपीचा खात्मा करावा. समाजात अशा पद्धतीची घटना पुन्हा घडूच नये यासाठी आरोपीस कठोरात कठोर शासन करून स्त्रीयांवर अत्याचार अथवा बलात्कार केल्यास काय होते ? याचे उदाहरण समाजाच्या समोर ठेवावे,अशी भावना यावेळी समस्त धारकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या आक्रोश मोर्चा प्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती.



    मोर्चापूर्वी जमलेल्‍यांनी आर्यास श्रद्धांजली अर्पण करत या गुन्ह्याचा तपास तातडीने करत खटला जलदगती न्‍यायालयात चालवण्याची मागणीही करण्‍यात आली आहे.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.