स्तंभलेख – शनिवार, 25 ऑक्टोबर 2025.
सकल लोहार समाज महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय लोहार समाज कार्यकर्ता एकत्रीकरण भव्य महामेळावा, केज जिल्हा बीड येथे शनिवार दि. २५ ऑक्टोंबर रोजी असा मेळावा पार पडला. त्यामध्ये लोहपुरुष, पुरस्कार मूर्ती, स्व. चंद्रकांत शंकरराव वसव रा. दहिवडी,ता.माण,जि.सातारा यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार राज्यस्तरीय लोहार समाजातील पदाधिकारी व इतर राज्यस्तरीय प्रमुख पाहुणे यांचे हस्ते प्रधान करण्यात आला. यावेळी तमाम महाराष्ट्रातील सकल लोहार समाज बांधव यांच्या उपस्थिती हा महामेळावा पार पडला.यावेळी त्यांचे कुटुंबीय यांनी हा पुरस्कार स्वीकारून त्याबाबत ॲड. महेश चंद्रकांत वसव,आर्किटेक्चर सिविल इंजिनियर प्रकाश वसव व त्यांचे कुटुंबीय यांनी आभार व्यक्त केले.
स्व.चंद्रकांत वसव यांची जीवन चरित्र माहिती घेतली असता,आदरणीय चंद्रकांत शंकरराव वसव यांचा जन्म दहिवडी ता. माण, जि. सातारा येथे दि. २६ जुलै १९४९ रोजी झाला. त्यांचे पिताश्री कै.शंकरराव वसंत हे पैलवान होते. त्यांना एकूण सहा मुली व दोन मुले होती. चंद्रकांत शंकरराव वसव यांचा जन्म हा त्यांची आई सोनुबाई यांच्या पोटी जन्म झाला. चंद्रकांत वसव यांचे पिताश्री कै. शंकरराव वसव हे दहिवडी येथील हजरत सय्यद कादर्शाबाबा दर्गाह यांचे व निलकंठ महाराज, दहिवडी यांचे निस्सिम भक्त होते. चंद्रकांत वसव यांच्या आई सोनुबाई यांना सहा मुली व एक मुलगा असे सात आपत्ते झाल्या नंतर त्यांची आई मृत्यू पावली होती. परंतु शंकरराव वसव यांना महाराजांनी माहिती दिली होती की, तुझ्या पोटी आठवे फळ जन्माला आल्या नंतर हजरत सय्यद कादर्शाबाबा यांचा त्यांचे हस्ते उद्धार होणार आहे.त्यावेळी शंकरराव वसव यांनी त्यांची पत्नी सोनुबाई चे निधन झाले नंतर तात्काळ शंकरराव वसव यांनी महाराजांची भेट घेतली. त्यावेळी महाराजांनी सांगितले की, चिंता करू नको तू परत घरी जा व शंकरराव वसव हे पुन्हा घरी आले त्यावेळी त्यांची पत्नी सोनुबाई चे अंत्यविधीची तयारी सुरू असताना, अचानक त्यांची पत्नी सोनुबाई म्हणजेच चंद्रकांत शंकरराव वसव यांची होणारी आई पुन्हा जिवंत झाल्या आणि त्यानंतर शंकरराव वसव यांना आठवे फळ म्हणजेच पुत्र चंद्रकांत शंकरराव वसव हे आपत्य झाले.
पुढे चंद्रकांत शंकरराव वसव हे वयाच्या एक ते दोन वर्षाचे असताना त्यांची आई मृत्यू पावल्या. त्यांचे वडील शंकराव वसव यांनी सहा मुली व दोन मुले यांचा सांभाळ केला. त्यांना मातृप्रेम मिळाले नाही. परंतु शंकराव वसव यांनी खूप मायेने मुलांना सांभाळले. वयाच्या ६६ व्या वर्षी शंकराव वसव यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे ही सर्व मुले,आई व वडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली. चंद्रकांत वसव हे गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन माण तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामध्ये,सुरुवातीला अकाउंटंट म्हणून नोकरीस रुजू झाले. त्यानंतर जी.डी.सी. अँड ए ची परीक्षा देऊन महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आणि या पदवी आधारे ते माण तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे मॅनेजर झाले. त्याच दरम्यान सन १९७८ ते १९८३ साला मध्ये दहिवडी ग्रामपंचायत चे सरपंच पदी विराजमान झाले. त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या सरपंच पदाच्या कार्यक्रमांमध्ये दहिवडी गावाचा सर्वांगीण विकास केला. अनेक गावस्वरूपी विकास कामे केली. त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, गाव – वाडी वस्ती वरील रस्ते, पाण्याची टाकी, वॉटर सप्लाय व दिवाबत्ती लाईट अशी अनेक कामे पूर्ण केली. त्यामुळे दहिवडी नगरीमध्ये त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे.
दरम्यान सन १९८६ साली त्यांनी श्री. सिद्धनाथ शिक्षण संस्था, दहिवडी ची स्थापना केली. त्यामध्ये आदर्श मराठी प्राथमिक शाळा हा उपक्रम चालू केला ते हयात होते तो पर्यंत शिक्षण संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष राहिले. शिक्षण संस्थेला त्यांनी फार मोठे योगदान दिले,आदर्श शिक्षण पद्धतीचे उदाहरण दिले तसेच शिक्षण संस्थेला शासकीय कोट्यातून जागा, त्याच प्रमाणे शिक्षण संस्थेला शंभर टक्के अनुदान मिळविले. वार्षिक स्नेहसंमेलन, वर्ग सुशोभीकरण व आधुनिक शिक्षण पध्दत अवलंबिली तसेच इतर कामे करून मोलाचे योगदान देऊन शिक्षण संस्थेला नावारूपास आणले.
त्यांचा विवाह सन १९७६ मध्ये विवाह झाला त्यांना पत्नी महानंदा या गृहिणी असून दोन मुले व एक मुलगी असे त्यांचे कुटुंब आहे. मोठा मुलगा महेश वसव यास वकील केले व लहान मुलगा प्रकाश यास आर्किटेक्चर सिव्हील इंजिनियर केले आणि मुलगी पूनम ह्या गृहिणी असून या सर्व कुटुंबीयांनी चंद्रकांत वसव यांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे.
चंद्रकांत शंकरराव वसव हे त्यांच्या कारकिर्दी मध्ये माजी आमदार सदाशिवराव पोळ तात्या यांचे फार निकटवर्तीय होते. त्यांचे अत्यंत जवळीकतेचे व विश्वासाचे नाते संबंध असल्याने सदाशिव पोळ तात्यांनी चंद्रकांत वसव यांचे वर अनेक तालुकास्तरीय जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्याच प्रमाणे राजकीय व सहकार बाबत तालुकास्तरीय जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्या ते उत्तम प्रकारे पार पडत होते. त्यामुळे त्यांचा माण तालुक्या मध्ये गावोगावी फार मोठा जनसंपर्क असून त्यांना मानणारा फार मोठा शेतकरी वर्ग सुद्धा आहे.
महाराष्ट्र शासनाकडून गावोगावी महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती स्थापन करण्याचा निर्णय झाल्याने, दहिवडी शहरांमध्ये हा निर्णय झाल्या पासून महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे चंद्रकांत शंकरराव वसव हे ते हयात असे पर्यंत अध्यक्ष राहिले. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दी मध्ये अनेक नवे जुने गाव स्वरूपी वाद तंटे मिटवून गाव तंटामुक्त करणे कामी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांची उत्तम वक्तृत्व शैली व उच्च विचार, आध्यात्मिक व धार्मिक, राजकीय अशा विचाराने ग्रामस्थ प्रभावित होऊन त्यांचा निर्णय आनंदाने स्वीकारून तो निर्णय अंतिम मानायचे. त्यास गावस्वरूपी ग्रामस्थांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळत होता. त्याचप्रमाणे दहिवडी न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ते पॅनल पंच म्हणून काम पाहत होते.
सातारा मार्केटिंग फेडरेशन यांची जिल्हास्तरीय पतसंस्था सातारा येथे कार्यरत होती. त्यांनी काही वर्ष चेअरमन पद त्यांनी भूषविले. या पतसंस्थेस मोलाचे योगदान दिले होते. तसेच दहिवडी वि.का.स. सेवा सोसायटी चे संचालक पदी निवडून आले होते. त्यानंतर चेअरमन पदी त्यांचे नाव कायम झाले होते परंतु दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
चंद्रकांत शंकरराव वसव यांचा जन्म झाला तो महाराजांनी भाकीत केल्या प्रमाणे, शंकरराव वसव यांचे आठवे फळ म्हणजेच चंद्रकांत वसव यांना कादरशा बाबांची सेवा पुढे नेण्याचे सौभाग्य मिळाले.त्यांचे पिताश्री शंकरराव वसव हे पैलवान होते. त्यावेळी मानगंगा नदी मध्ये पाणी असायचे, पहाटे साडेतीन वाजता उठून व्यायाम करून माण गंगेत अंघोळ करून, ओल्या पडद्याने पाण्याचा एक तांब्या कादर्शाबाबा यांच्या समाधीवर ( तुर्बतीवर ) वाहून यायचे, ही शंकरराव वसव यांची आयुष्यभराची सेवा होती. शंकरराव वसव यांचे वडील वडील म्हणजेच चंद्रकांत वसव यांचे आजोबा भाऊराव वसव हेही हजरत सय्यद कादर्शाबाबा यांचे भक्त होते. समाधी ठिकाणी दर्ग्याची स्थापना करण्याची आहे असा दृष्टांत चंद्रकांत वसव यांना झाला. पुढे त्यांनी दृष्टांताप्रमाणे, ग्रामस्थांना व मुस्लिम समाज बांधवांना सोबत घेऊन माणगंगा नदीच्या नजीक हजरत सय्यद कादर्शाबाबा दर्गाहाचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. परंतु अपेक्षित आर्थिक सहकार्य न मिळाले नाही. स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असून सुद्धा त्यांनी एक पण ठेवला की, “जो पर्यंत दर्गाह चे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत माझे घराची एक वीट सुद्धा लावणार नाही.” दृष्टांता मध्ये दर्गाह ची जी प्रतिकृती दाखवली होती त्याच प्रमाणे प्रत्येक विटेमध्ये जीव ओतून काम करून, दर्गाहाचे बांधकाम पूर्ण केले व मुस्लिम धर्मशास्त्रा प्रमाणे सन १९९७ साली दर्गाह चा कळस बसविला. योगायोगाने तो दिवस विजयादशमी दसरा होता हजरत सय्यद कादर्शा बाबा या दर्गाहाचे उरूस यात्रा सुरू केली. ती सेवा अखंडपणे त्यांनी हयात असे पर्यंत कायम ठेवली व आजही वसव परिवाराची पाचवी पिढी या सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे वसव परिवाराला मानणारा, मुस्लिम धर्मातील जनसमुदायाचा मोठा वर्ग आहे.
चंद्रकांत वसव यांना समाजकार्याचीही फार मोठी आवड होती. ते जातीने गाडी लोहार या समाजाचे असल्यामुळे ते समाजाचे महाराष्ट्राचे महासंघावर सह सचिव या पदावर कार्यरत होते. त्यांचे कारकिर्दीत पंढरपूर येथे राज्यस्तरीय महा अधिवेशन झाले, त्यास मोलाचे योगदान त्यांनी दिले होते. त्यामध्ये लोहार समाजास एन.टी.ब चे आरक्षण व समाजास आर्थिक विकास महामंडळ मंजूर व्हावे म्हणून प्रयत्न केले. त्याच प्रमाणे अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य, या सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य स्तरीय अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीमध्ये अनेक सामाजिक कार्य केले. त्यामध्ये त्यांनी एकूण ३५४ लोहार समाज सभा घेतल्या तसेच एकूण ९३ लोहार समाज वधू-वर पालक परिचय मेळावे घेतले. लोहार समाजातील तंटामुक्ती रामशास्त्री समिती सभा या एकूण १३१ पार पाडल्या तसेच कार्यक्रम नियोजन सभा १७७२ एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतल्या आणि एकूण ३५ समाज जनजागृती मिळावे घेतले त्याचप्रमाणे महाराष्ट्र पातळीवर विविध अधिवेशने वर्धापनदिन योजित केले. त्यामध्ये समाजाला सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आपण समाजास काही तरी देणे लाग, ती ही भावना मनी बाळगून समाजामध्ये संस्था अंतर्गत तंटामुक्त समाज समिती स्थापन करून समाजा अंतर्गत वाद तंटे मिटवून समाजातील लोकांना न्याय देण्याचे काम केले. त्याच प्रमाणे समाज संस्थे अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर गाव तेथे शाखा असा उपक्रम राबवून समस्त लोहार समाज एकत्रित आणणे कामी प्रयत्न केला. त्यांचे उत्तम व उच्च विचारांच्या धरतीवर उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांचे महाराष्ट्रभर ओळख होती. त्यांच्या वक्तृत्वाला महाराष्ट्रातील तमाम लोकांनी दाद दिली होती यामुळे त्यांना मानणारा समाजातील मोठा वर्ग आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळ मंजूर केले आहे.यासाठी त्यांनी मागील ३० वर्षांपूर्वीच पायाभरणी केलेली आहे. त्याचे फलित तमाम महाराष्ट्रातील समाजाला उशिरा का होईना पण मिळाले आहे असे फार मोठी मोलाची कामगिरी त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेली आहे.त्यांना सांस्कृतिक धार्मिक कार्यामध्ये सुद्धा विशेष आवड होती. म्हणून दहिवडी येथील बाजार पटांगण येथे वैभव नवरात्र उत्सव मंडळ उपक्रम राबविला. दुर्गा माता मंदिर येथे स्थापना केले त्यापूर्वी दुर्गा माता ची मूर्ती त्यांचे बंधू सुरेश शंकरराव वसव हे करीत होते. नवरात्र उत्सवामध्ये दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करून विविध उपक्रम त्यामध्ये धार्मिक विधी, गंगापूजन, महाप्रसाद, राक्षस दहन, होम हवन, दुर्गा सप्तशती असे व विविध कार्यक्रम आयोजित करत होते. या मंडळाचे ते मंडळाचे अध्यक्ष होते. दुर्गोत्सवास दहिवडी ग्रामस्थ फार मोठ्या उत्साहाने साथ देत होते तो उपक्रम आजही सुरू आहे. चावडी चौक बतावणी संघटना गणेश मंडळ तसेच हनुमान गणेश मंडळास सहकार्य व मार्गदर्शन करून समाजातील हुंडाबळी, शेतकरी आत्महत्या, दारूबंदी, ग्रामस्वच्छता अभियान, भारत माता देखावा अशा विविध देखाव्यातून समाज प्रबोधन असे योगदान त्यांचे होते.
त्याचप्रमाणे ते दहिवडी नगरीचे सरपंच असते वेळी दहिवडीचे ग्रामदैवत श्री. सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचे ते विशेष भक्त होते. त्यांच्या कारकिर्दी मध्ये मूर्ती स्थापना व कलश रोहन व त्यानंतर पुढे ग्राम देवाची यात्रा व रथोत्सव यामध्ये मोठा सहभाग होता. धार्मिक कार्यामध्येही त्यांचे मोलाचे योगदान त्यांनी दिले होते. चंद्रकांत वसव यांनी माण तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे आवारामध्ये हनुमान मंदिराची स्थापना केलेली आहे. त्या ठिकाणी सालाबाद प्रमाणे हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करून महाप्रसादाचे आयोजन केले जात होते.
असे एकूणच अष्टपैलू , विचारवंत, पदसिध्द, पदविधर व कलाकार व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती म्हणजे चंद्रकांत शंकरराव वसव हे होते. त्यांनी त्यांच्या हयाती मध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, संस्कृतिक, अध्यात्मिक, धार्मिक, वैचारिक, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे फार मोठे योगदान होते. त्यांना मानणारा राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रातील मोठा वर्ग आहे. या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रेम करणारा फार मोठा वर्ग आहे. या अशा व्यक्तिमत्त्वाला अचानकपणे दि. ०९ डिसेंबर २०१५ रोजी त्यांना देव आज्ञा झाली. त्यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता अलोट असा जनसमुदाय एकत्रित आला होता. त्यावेळी समाजाला फार मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती कधीही पुन्हा भरून येऊ शकत नाही, अशी व्यक्ती जन्माला येऊन गेली त्यांना आधुनिक काळातील ‘संत महात्मा’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘मरावे परी किर्ती रुपी उरावे’ ही म्हण त्यांना साजेशी आहे. ‘तू ना हिंदू बनेगा, ना तू मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा.’ असे त्यांच्या आचरणातून दिसून येते. अनेक लोक त्यांना ‘आमुचे दैवत’ असेही मानतात. अशा महान व्यक्तिमत्वास व त्यांच्या संपूर्ण जीवनकार्यास शतशः नमन. अशा महामानवास विनम्र अभिवादन !



