वृत्त दि. – शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५
वृत्त – माण, सातारा.
माण तालुक्यातील कुळकजाई – शेडगेवाडी रस्त्यावर दि. ५ नोव्हेंबर रोजी, एका व्यक्तीचा मृतदेह झुडपात नग्नावस्थेत संशयास्पद आढळून आला. पोलीस तपासाअंती हा मृतदेह त्याच गावातील कुळकजाई येथील ५३ वर्षीय गृहस्थ रमेश मारुती इंगळे यांचा आहे हे निष्पन्न झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून दहिवडी पोलिसांनी या व्यक्तीचा खून झाल्याचा निष्कर्ष काढला.
या घटनेचा तपास करून हा खून नेमका कुणी केला? हे शोधणे पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि दहिवडी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा छडा लावला.

गोपनीय माहिती, तांत्रिक बाबी आणि घटनास्थळावरील पुरावे तसेच पंचनाम्याच्या आधारे शुभम दत्तात्रय चव्हाण वय २९ वर्षे याला कुळकजाई येथूनच राहत्या घरातून ताब्यात घेतले. मृतदेह सापडल्यापासून अवघ्या तीन ते चार तासात पोलिस संशयितापर्यंत पोहचले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. यामध्ये त्याने मयत रमेश इंगळे हा दारू पिऊन शिवीगाळ करत असल्याने त्याच दगडाने मारून त्याचा खून केला असल्याची कबुली दिली. तसेच न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. तुषार दोषी सो. अपर पोलीस अधीक्षक मा. वैषाली कडूकर सो., उपविभागीय पोलीस अधीकारी मा. रणजित सावंत सो., पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस स्टेशनचे दत्तात्रय दराडे सहायक पोलीस निरीक्षक, महिला पोलीस उप निरीक्षक स्वाती धोंगडे, पोलीस हवा. श्रीनिवास सानप, विजय खाडे, नितीन धुमाळ, संभाजी खाडे पोलीस नाईक पुनम रजपुत, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे, निलेश कुदळे, मल्हारी खाडे, महेंद्र खाडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक रोहित फारणे, पोलीस हवा मनोज जाधव, लैलैश फडतरे, लक्ष्मण जगदने, मोहन पवार, स्वप्नील कुंभार, अमित माने, अजय जाधव, अमित झेंडे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील दौंड, रविराज वर्णे यांनी केली असुन गुन्हयाचा तपास दत्तात्रय दराडे सहायक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.