कृषीवार्ता
Trending

⚡ शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बेमुदत उपोषणाची हाक; १७ जूनपासून दहिवडीत आंदोलन

वृत्त – माण, सातारा.

संपादक – चैतन्य नंदकुमार काशिद.


     माण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माण तालुका अध्यक्ष राजू मुळीक यांनी १७ जून २०२६ पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

     “हा लढा शेतकऱ्यांच्या अस्मितेचा असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही,” अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. महावितरणच्या कारभारामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर हे आंदोलन केंद्रित असणार आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या

🔹 शिंगणापूर फिडरवरील सध्या सुरू असलेले सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंतचे लोडशेडिंग बंद करावे.

भवानवाडी, खरात वस्ती, खांडे वस्ती, मुळीक वस्ती, एन ए प्लॉटिंग (शिवजीनगर), खांडे वस्ती, माने वस्ती आदी भागांना कायमस्वरूपी गावठाण वीज जोडणी द्यावी.

🔹 डी.पी.वरील फ्युज नवीन टाकण्यात यावेत व वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या तातडीने सोडवाव्यात.

दहिवडी महावितरण कार्यालयासमोर उपोषण

हे बेमुदत उपोषण महावितरण कार्यालय, दहिवडी (ता. माण, जि. सातारा) येथे १७ जूनपासून सुरू होणार असून शेतकरी, नागरिक आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

   स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, “शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाणार नाही; न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही.”

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.