सामाजिक
Trending
गोंदवले बुद्रुक येथे स्वप्नील पारशे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वृत्त – गोंदवले बुद्रुक, ता.माण,जि.सातारा
वृत्त दि.- २२ जून २०२६
प्रतिनिधी – नवनाथ भिसे
गोंदवले बु.येथील वेताळबा मंदिर परिसरात सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पारशे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला पंचक्रोशीतील तरुण आणि ग्रामस्थांनी मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वाढदिवसाचा अवाजवी खर्च टाळून समाजासाठी उपयुक्त ठरेल असा उपक्रम राबवल्याबद्दल या शिबिराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
उत्साही वातावरणात प्रारंभ सकाळी शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले . यावेळी उपस्थित मित्रमंडळींनी आणि ग्रामस्थांनी स्वप्नील पारशे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस साजरा करण्याची ही समाजोपयोगी पद्धत इतर तरुणांसाठी आदर्श आहे.
‘एसपी फ्रेंड्स क्लब’च्या कार्यकर्त्यांनी आणि पंचशील तरुण मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या चोख नियोजनामुळे सकाळपासूनच रक्तदात्यांनी गर्दी केली होती. विशेषतः पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्या तरुण-तरुणींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. अधिकृत रक्तपेढीच्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय पथकाने रक्त संकलनाचे काम अतिशय काळजीपूर्वक पार पाडले.
“रक्तदान हे जगातील सर्वात मोठे दान आहे. माझ्या वाढदिवसाचे निमित्त साधून कोणाचे तरी प्राण वाचवण्यास आमचा खारीचा वाटा लाभत आहे, याचा मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना सार्थ अभिमान आहे.”
— स्वप्नील पारशे (सामाजिक कार्यकर्ते)
