महाराष्ट्र
दहिवडीत १९ एप्रिल रोजी भव्य ‘हिंदू संमेलनाचे’ आयोजन; सकल हिंदू समाजाची वज्रमूठ

वृत्त – माण, सातारा.
संपादक – चैतन्य नंदकुमार काशिद.
माण तालुक्यातील दहिवडी येथे हिंदुत्वाचा हुंकार आणि हिंदू एकता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ‘सकल हिंदू समाज दहिवाडी मंडल’ च्या वतीने भव्य ‘हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी हे संमेलन संपन्न होणार असून, यानिमित्त शहरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा आणि वेळ
या सोहळ्याची सुरुवात दुपारी ठीक ४:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (फलटण चौक) येथून निघणाऱ्या भव्य ‘शोभा यात्रेने’ होईल. ही शोभा यात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत संमेलन स्थळावर पोहोचेल. संमेलनाचे मुख्य ठिकाण कांदा मार्केट मैदान, मायणी रोड, दहिवडी हे निश्चित करण्यात आले आहे.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
या संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून धर्माचार्य श्री श्री शांतिगिरी जी गुरु शिवगिरी जी महाराज (आंतरराष्ट्रीय महामंत्री, पंच दशनाम जुना आखाडा) उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शना सोबतच:
प्रमुख वक्ते: श्री.ईश्वर रायन्नावर (सामाजिक कार्यकर्ते)
मातृशक्ती: सौ.रूपाली ताई महाडिक (सामाजिक कार्यकर्त्या)
या मान्यवरांचे प्रबोधनपर विचार उपस्थितांना ऐकता येतील. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून धर्मरक्षण, हिंदू संस्कृतीचे संवर्धन आणि सामाजिक एकता या विषयांवर या संमेलनात विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
महाप्रसादाचे आयोजन
संमेलनाच्या सांगतेनंतर सर्व भाविक आणि उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजकांचे आवाहन
“हिंदू एकता हीच राष्ट्रशक्ती आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी या संमेलनात सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन सकल हिंदू समा दहिवडी मंडल यांच्या वतीने करण्यात आले आहे.