ताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
Trending

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक ! स्व. भगवानराव गोरे यांना निरोप देण्यासाठी लोटला जनसागर…

भगवानराव गोरे यांचे दिर्घ आजाराने पुण्यात निधन


वृत्त दि. – मंगळवार,२५ फेब्रुवारी २०२५.

वृत्त – बोराटवाडी,ता.माण,जि.सातारा.


        राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे ( दादा ) यांचे मंगळवारी पहाटे दिर्घ आजाराने दुख:द निधन झाले. पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माण, खटाव तालुक्यांसह जिल्ह्यावर शोककळा पसरली. बोराटवाडी ( ता. माण ) येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बोराटवाडीत मोठा जनसागर लोटला होता.भगवानराव गोरे यांना राजकीय, सामाजिक,सहकार, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच शोकसंदेशाद्वारे श्रद्धांजली वाहिली.



     भगवानराव गोरे यांच्यावर गेल्या चार महिन्यांपासून पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात सुपुत्र अंकुश,जयकुमार,शेखर व कन्या सुरेखा,जावई सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. भवानराव गोरे १९९० ते ९५ बोराटवाडीचे सरपंच होते. २०२० पासून त्यांनी येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमनपद भूषविले. सातारा जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे मार्गदर्शक आणि माण तालुका संघटनेचे ते अध्यक्ष होते. समता शिक्षण मंडळातही ते संचालक पदावर कार्यरत होते.



     भगवानराव गोरे यांना जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,खा. उदयनराजे भोसले, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. राहुल कुल, आ. सचिन पाटील, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, मा. आ. डॉ. दिलीपराव येळगावकर, मदन भोसले, राम सातपुते, हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, एसपी समीर शेख, सोलापूरचे जिल्हाधिकारी , सीईओ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रांत उज्वला गाडेकर, डिवाय एसपी अश्विनी शेंडगे, विक्रम पावसकर, पंढरपूरचे पोलिस निरिक्षक विश्वजीत घोडके, सर्व राजकीय पक्षांचे आजी, माजी पदाधिकारी यांनी श्रध्दांजली अर्पण करुन मंत्री जयकुमार गोरे, उद्योजक अंकुश गोरे, जिल्हा बॅंकेचे संचालक शेखर गोरे, नगरसेविका सौ. सुरेखा पखाले यांच्यासह संपूर्ण गोरे कुटुंबियांचे सांत्वन केले.



      मंत्री गिरीश महाजन, मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री आदिती तटकरे, खा. सुप्रिया सुळे, प्रधान सचिव एकनाथ डवले, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, आ. मनोज घोरपडे, आ. राणा जगजीतसिंह पाटील,आ. देवेंद्र कोठे, आ. विजयकुमार देशमुख, आ. हेमंत पाटील, आ. योगेश टिळेकर, आ. चित्राताई वाघ,आ. समाधान आवताडे,आ. सचिन कल्याण शेट्टी,आ. सुभाष देशमुख,आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. अमोल महाडिक,आ. सुरेश धस,आ. गिरिष चौधरी,आ. सुधीर मुनगंटीवार, आ. विजय देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे, जीवन गलांडे, मनोहर गव्हाड, रुपालीताई चाकणकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष हरिष पाटणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण,मा. आ. दिपक आबा साळुंखे,मकरंद देशपांडे,चेतनसिंह केदारी,आप्पासाहेब देशमुख, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, सुंदरगिरी महाराज,मुकुंद आफळे, सागर महाराज बोराटे, खटाव, माण तहसिलदारांसह सांगली, सातारा जिल्हा सातारा,सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी शोकसंदेश पाठवून श्रद्धांजली अर्पण केली.


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन …
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोकसंदेश पाठवून मंत्री जयकुमार गोरे आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. या दु:खातून सावरण्याची शक्ती गोरे कुटुंबियांना मिळो अशी त्यांनी प्रार्थना केली.


वडिलांच्या निधनाने ना. गोरे यांच्या जीवनात पोकळी

—————————————————-

नामदार जयकुमार गोरे यांच्या निवडणुकीच्या कार्यकाळात वडील भगवानराव गोरे यांची मोठी मदत होत असे. आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी ते मतदारसंघ अहोरात्र पिंजून काढायचे. जयकुमार यांना चार वेळा आमदार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आता त्यांच्या जाण्याने जयकुमार गोरे यांच्या जीवनात पोकळी निर्माण झाली आहे.

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.