आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्रविशेषसामाजिक

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा

वृत्त – पुणे, महाराष्ट्र


        ब्रिजिंग ब्रेन्स भोसरी ,पुणे आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे ३०० वी जयंती निमित्त ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे . व्हिडीओ निर्मितीची अंतिम दि. १० एप्रिल २०२५ असून, अंतिम निकाल ३१ /मे / २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करून व्हिडिओ अपलोड करावा. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.



     या स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे आहेत.

१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आधुनिक युगापूर्वी कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या संकल्पक, २) स्त्री सत्ता आणि अध्यात्म:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अद्वितीय नेतृत्व,3) सीमांच्या पलीकडे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टिकोन, ४) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सामाजिक न्याय व लोककल्याणाची दृष्टी – आजच्या युगातील तिचे महत्त्व



             हे मुख्य विषय असून यापैकी कोणत्याही एका विषयावर चार ते सहा मिनिटांपर्यंत आपल्या भाषणाचा व्हिडिओ सादर करू शकता या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ११०००/- हजार रुपये ,व्दितीय क्रमांकास ७०००/-हजार रुपये ,तृतीय क्रमांकास ,५०००/-हजार रुपये तसेच १५ उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. सहभाग घेण्यार्या प्रत्येकाला सर्टिफिकेट दिले जाईल. स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये व्हिडिओ निर्मिती करता येईल. व्हिडीओ निर्मितीची अंतिम दिनांक १०/४ /२०२५ असून, अंतिम निकाल ३१ /५/ २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुढील लिंकवर रजिस्ट्रेशन करून व्हिडिओ अपलोड करावा


Registration Link : https://forms.gle/aR9uoEWQMKFHnPGk6


अधिक माहितीसाठी


 फेसबुकवर https://www.facebook.com/profile.php?id=61568457387012


अधिक माहितीसाठी ९२२६३५७४०० या व्हाट्सअप क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.