आरोग्य व शिक्षणसामाजिक

भारताचे प्रथम चक्रवर्ती सम्राट – महापद्मनंद


     महापद्मनंद यांचा जन्म मगध (बिहार)राज्यातील मलय गावात झाला होता.त्यांचे वडील नंदीवर्धन हे शिशुनाग वंशाचे शेवटचे राजे होते.तत्कालीन भारतामध्ये पितृसत्ताक पद्धत होती.ब्राम्हण,जैन,बौद्ध ग्रंथ व युनानी लेखकांच्या मतानुसार महापद्मनंद हे शूद्र वर्णातील नाभिक जातीचे होते.महापद्मनंदला भारताचा पहिला शूद्र सम्राट होण्याचा मान मिळाला आहे.महापद्मनंद हे गौरवशाली नंद घराण्याचे संस्थापक होते.



      महापद्मनंदने काशी,कौसल,मल्ल,चेदी,वत्स, मत्स्य,अंग,मगध,मिथिला,अवंती,कुरु,पांचाल,गांधार,कंबोज,शुरसेन,अश्मक अर्थात कलिंग ही सोळा महाजन पदे जिंकून घेतली.सर्व क्षत्रियांचा पराभव करून सार्वभौम सम्राट बनून एकछत्री प्रशासन व्यवस्था राबविली.म्हणूनच त्यांना ‘केंद्रिय शासन पद्धतीचे जनक’ असे म्हटले जाते.विविध साहित्यामध्ये त्यांचेबद्दल सर्व क्षत्रांतक,दुसरा परशुराम,भार्गव,एकराट,एकछत्र राजा,अनुल्लांघन शासन असा उल्लेख आढळतो.


           महापद्मनंदने स्वतःकडे असणारी चतुरंग सेना राजधानीत न ठेवता साम्राज्याच्या सीमेवर ठेवली होती.याच कालखंडात सिकंदर स्वारीसाठी आला होता परंतु युनानी सैन्याने नंदाची विराट सेना पाहून आक्रमण करण्याचे धाडस सुद्धा दाखविले नाही.


        महापद्मनंदने आपल्या विशाल साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्रला(पटणा) शिक्षणाचे केंद्र बनविले.व्याकरणाचे आचार्य पाणिनी हे महापद्मनंदचे मिञ होते.त्यांनी महापद्मनंदच्या सहकार्याने संस्कृत व्याकरणाचे प्रमाण मानला जाणाऱ्या जगप्रसिध्द ‘अष्ठद्याय’ ग्रंथाची निर्मिती केली.महापद्मनंदच्या दरबारात वर्ष,उपवर्ष,आचार्य पिंगल,कत्यायन,वर रुची,ब्याडी इ.महान विद्वानांना राजाश्रय मिळाला होता.


            जगाच्या इतिहासात प्रथमच महापद्मनंदनी व्यापार वृद्धीसाठी ‘कर्षपन’ हे चांदीचे नाणे काढले.संपूर्ण साम्राज्यात एकाच वजनमापणांची प्रमाणित पद्धत तयार केली त्यांना ‘नंदक्रमनिती’ म्हणून ओळखले जाते.


             महापद्मनंदची पंडूक,पांडूगती,भुतपाल,राष्ट्रपाल,गोविषणाक,दशसिद्धक,कैवर्त,धनानंद ही मुले नवनंद म्हणून ओळखली जातात.इतिहासप्रसिद्ध धनानंद हा नंद घराण्याचा शेवटचा सम्राट होता.


 


        नंद वंशाच्या महानतेची प्रचिती पतंजली रचित महानंद महाकाव्य व सम्राट चंद्रगुप्त रचित कृष्णचरित महाकाव्याच्या सुरुवातीच्या ३ श्लोकांमध्ये दिसून येते.परंतू इथल्या जातीवादी व्यवस्थेने हे ग्रंथ समूळ नष्ट केले.महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळ अर्थात् बालभारतीला सुध्दा इयत्ता ६ वी च्या इतिहास पुस्तकातील मगधचे नंद घराणे या प्रकारनात सम्राट महापद्मनंद यांच्या नावाचा विसर पडला आहे.तरी आजही या देशातील लेणीच्या अबोल भिंती महापद्मनंदच्या इतिहासाची महती गात आहेत.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.