आरोग्य व शिक्षणक्राईमक्रीडा व मनोरंजनजिल्हाताज्या घडामोडीविशेषसंपादकीयसामाजिक
Trending

श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त दहिवडीत या रस्त्यांवर नो एंट्री ! दहिवडी पोलीस स्टेशन यांची जाहीर सूचना…

 

वृत्त दि. – २६ एप्रिल २०२५

वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.


    सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी या देवांची यात्रा रविवार दि.२६ ते सोमवार दि.२८ एप्रिल २०२५ यादरम्यान धार्मिक तसेच करमणूक आणि बैलगाडा शर्यती,कुस्ती स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.


 


      रविवार दि.२७ एप्रिल रोजी श्री सिद्धनाथ यात्रेचा मुख्य दिवस असून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा धार्मिक परंपरेनुसार विवाह सोहळा होऊन आरती झाल्यानंतर या देवांच्या मुख्य मूर्ती रथात बसवल्या जातात व श्री सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं… या गजरात आणि सासनकाट्या नाचवत ढोल ताशांच्या निनादात हत्ती,घोडे,बॅन्जो यांच्या साथीने दहिवडी शहरातून श्री सिद्धनाथ मंदिर ते मुख्य रस्त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (मार्डी चौक), संविधान चौक (मायणी चौक), छत्रपती शिवाजी महाराज चौक (फलटण चौक), एस.टी स्टँड ते परत मुख्य रस्त्याने पंचायत समिती मार्गे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (तेली गल्ली), श्री गणेश पेठ आणि पुढे श्री सिद्धनाथ मंदिर या मार्गाने भव्य मिरवणूक काढली जाते.

    या पार्श्वभूमीला अनुसरून, रविवार दि.२७ एप्रिल रोजी श्री सिद्धनाथ देवाची रथ मिरवणूक यात्रेत मोठ्या संख्येने जनसमुदाय येण्याची दाट शक्यता असल्याने, वाहनांचा अडथळा निर्माण होवून वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम (३३) (१) या अधिकारात दहिवडी शहरात वाहतूक व्यवस्थेमध्ये एक दिवसीय बदल केला आहे.



       शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने वाहतुकीचे नियोजन योग्य रीतीने करून सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत दहिवडी एसटी स्टँड ते सिद्धनाथ मंदिर कॉर्नर असा रोड वाहतुकीसाठी बंद करून गोंदवले बुद्रुक ते पिंगळी चौक मार्गे एसटी स्टँड दहिवडी असा पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे.



       या सूचनेचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनी दत्तात्रय दराडे यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे तरी दहिवडी व दहिवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे विनम्र आवाहन श्री दराडे यांनी केले आहे.

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.