क्रीडा व मनोरंजनजिल्हाताज्या घडामोडीसामाजिक
Trending

ऋषिकेश हांगे व शुभांगी घोळवे यांचा साक्षगंध सोहळा ब्रह्मचैतन्य नगरी गोंदवले येथे उत्साहात साजरा !

 

वृत्त दि. – २८ मे २०२५

वृत्त – माण,सातारा.


        सातारा जिल्ह्यातील;खटाव तालुक्यातील एनकूळ येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक श्री.मधुकर मारुती हांगे ( सर ) यांचे सुपुत्र व श्री.ब्रह्मचैतन्य उद्योग समूह माण खटावचे मुख्य प्रवर्तक श्री.चंद्रकांत आण्णा खाडे पाटील यांचे नातू चि.ऋषिकेश मधुकर हांगे (RTO बारामती) व निंबोडी ता.इंदापूर येथील डॉ. विष्णू घोळवे यांची कन्या कु. शुभांगी विष्णू घोळवे यांचा साक्षगंध सोहळा (साखरपुडा) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ब्रह्मचैतन्य नगरी गोंदवले येथील शेतकरी भवनात आप्तेष्ट,कुटुंबीय,मित्रपरिवार व मान्यवर यांच्या उपस्थितीत दि. 28 मे रोजी दुपारी 3.00 वाजता मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.


   ‌‌ ‌   यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधुवरास शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या सुविद्य पत्नी सौ.सोनियाताई जयकुमार गोरे ( वहिनी ) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा साक्षगंध (साखरपुडा) सोहळा साजरा झाला. त्याचबरोबर नवनगर विकास प्राधिकरण पिंपरी चिंचवडचे माजी अध्यक्ष श्री.सदाशिवराव खाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक अर्जुनराव खाडे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्री अनिलभाऊ देसाई, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.बाळासाहेब खाडे तसेच वर पक्षाचे मामा  कांतीलाल खाडे पाटील,प्राचार्य डॉ.शंकरराव खाडे,मेजर मोहन वीरकर( सर ), खटावचे माजी सभापती शसंदीप मांडवे,माण पंचायत समितीचे माजी चेअरमन अतुलदादा जाधव, युवा नेते सिद्धार्थ भास्करराव गुंडगे, उद्योजक दत्तात्रय पांढरे,सतीश पोळ,निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र नामदेवराव नाईक,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग दराडे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले,सहाय्यक वनसंरक्षक (ACFO) विक्रांत वामनराव खाडे, उद्योजक धैर्यशील वामनराव खाडे, हांगे वकील,एनकूळ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रावसाहेब हांगे सर,उद्योजक विजय भगवानराव हांगे,दहिवडी कॉलेज दहिवडीचे प्राचार्य डॉ.खेत्रे,डॉ.दडस तसेच महाविद्यालय अधीक्षक औटे सर,विजय काळे सर यांच्यासोबत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सांगली, सातारा,कोल्हापूर,सोलापूर, पुणे, फलटण,अकलूज, सोलापूर,मुंबई,छ. संभाजीनगर येथील RTO अधिकारी यांनी आवर्जून उपस्थित राहुन नवदाम्पत्यास शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.



        या साक्षगंध सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने आप्तेष्ट उपस्थित होते.असा साक्षगंध सोहळा माण तालुक्यात प्रथमच झाला असावा अशी कुजबुज आप्तेष्टांमध्ये होती.

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.