ताज्या घडामोडी
Trending
कृतिशील,स्वाभिमानी अन् कणखर नेतृत्व म्हणजेच ना.जयकुमार गोरे ! नगराध्यक्षा सौ.निलम अतुल जाधव यांची ग्वाही…
स्तंभलेख – बुधवार, दि.१५ ऑक्टोंबर २०२५
माण-खटाव तालुक्याच्या जनतेच्या मनात घर करणारे, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा वाढदिवस आज, बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी उत्साहात व जल्लोषात साजरा होत आहे.
राजकारणात लोकसेवेचा नवा अध्याय लिहिणारे जयकुमार गोरे हे केवळ एक मंत्री नसून, ग्रामविकासाचा चेहरा आणि ग्रामीण भागाचा आशेचा किरण ठरले आहेत. त्यांच्या अथक परिश्रम, दृढ निश्चय आणि विकासदृष्टीमुळे राज्यात ग्रामविकास क्षेत्रात परिवर्तनाची नवी दिशा निर्माण झाली आहे.
सलग चार वेळा विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या गोरे यांनी माण-खटावच्या विकासाचे स्वप्न वास्तवात उतरवले. दुष्काळग्रस्त भागाला नवजीवन देण्यासाठी त्यांनी जीहे-कठापूर व उरमोडी सिंचन योजना पूर्णत्वास नेल्या, तर शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून हजारो शेतकऱ्यांना दिलासा दिला.
“गावाचे सरकार गावातच” या संकल्पनेला त्यांनी प्रत्यक्षात उतरवून राज्यभर ग्रामपंचायतींना नवे बळ दिले. पाणी योजना, शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण आणि ग्रामपंचायतींचे आधुनिकीकरण यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्री ग्राम समृद्धी व पंचायतराज अभियानाला नवी गती मिळाली असून अनेक गावे स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत.
अतिवृष्टी,दुष्काळ,संकट अशी कोणतीही वेळ असो,जयकुमार गोरे नेहमीच जनतेच्या सोबत उभे राहिले.त्यांच्या थेट संवादशैली,कार्यातील सातत्य आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे त्यांना आज राज्यात लोकनेते म्हणून ओळख मिळाली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त माण-खटाव परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून,“जय विकासपुरुष – जयकुमार गोरे!” असा जयघोष प्रत्येक गावागावात घुमत आहे. अशा कृतिशील, स्वाभिमानी अन् कणखर नेतृत्वाला “लोकसेवा टाइम्स” माध्यम परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
मंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहिवडीच्या नगराध्यक्षा सौ. निलम अतुल जाधव आपल्या सद्भावना व्यक्त करताना म्हणाल्या, ना.जयकुमार गोरे (भाऊ) खटाव-माण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी तथा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांचा बुधवार दि. १५ रोजी वाढदिवस साजरा होत आहे. मोठी राजकीय परंपरा नसताना सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेवून स्वतःच्या ताकतीवर चारवेळा आमदारकी जिंकून ग्रामविकास सारख्या महत्वाच्या मंत्री पदापर्यंत मजल मारुन संपूर्ण माणदेशाची मान उंचावणाऱ्या कृतिशील, स्वाभिमानी अन् कणखर नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
सुरुवातीच्या काळात ना.जयकुमार गोरे यांची काम करण्याची पद्धत बघितल्यानंतर ठाम विश्वास झाला की, हा नेता मतदार संघाचा कायापालट करेल. जया भाऊंची जीव ओतून पूर्ण ताकतीनिशी काम करण्याची पद्धत आवडल्याने जयाभाऊंवर विश्वास ठेवून आम्ही सुरुवातीपासूनच भाऊंबरोबरबर काम केलं आणि तेव्हापासून ते आजतागायत आम्ही ज्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवली. आज तोच नेता तमाम महाराष्ट्राला आशावादी वाटत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
देशाच्या स्वातंत्र्यापासून माण – खटाव तालुक्याकडे दुर्लक्ष होतं पण याच दुष्काळी मातीतून जया भाऊंचं नेतृत्व जागं झालं आणि आज हाच तालुका भाऊंच्या कामामुळे महाराष्ट्रात नावलौकिक होऊन गौरव मिळवत आहे. जयकुमार गोरे यांच्या समाजविधायक कार्याचे वादळ तमाम महाराष्ट्रात पेटले आहे हे बघून फार आनंद होत आहे. हे वादळ महाराष्ट्रात भरपूर काम करेल. स्वतःच्या हिमतीने ज्या पद्धतीने माण – खटाव तालुक्यांत विकास कामातून जनतेच्या मनावर राज्य केले केले, त्याच पद्धतीने महाराष्ट्रभरात लोकप्रिय मंत्री म्हणून काम करतील अस आमचा ठाम विश्वास आहे. भाऊंना महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळावी, महाराष्ट्राच्या जडणघडणीत आमच्या नेत्यांचे योगदान लाभावं. कर्तुत्वातून नेतृत्व तयार करणाऱ्या आमच्या नेत्याला त्यांच्या प्रत्येक कामात यश मिळावे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री पद, सोलापूरचे पालकमंत्री पद या माध्यमातून पंढरपूरची आषाढी वारी, नुकतीच उद्भवलेली पूर परस्थिती यामध्ये आदर्शवत काम करुन आपल्या कर्तुत्वाचा आलेख राज्यभर उंचावलेला आहे. अशा कर्तबगार नेतृत्वाला राज्यस्तरावर आणखी मोठे काम करण्याची संधी मिळण्यासाठी परमेश्वराने दीर्घायुष्य द्यावे.
हीच मनस्वी सद्भावना.
सौ.निलम अतुल जाधव
नगराध्यक्षा, दहिवडी नगरपंचायत दहिवडी.






