प्रशासकीय

शिखर शिंगणापूर यात्रेसाठी दहिवडी पोलिसांचा चोख बंदोबस्त ; भाविकांच्या सुविधेसाठी वाहतूक मार्गात मोठा बदल !

वृत्त – माण,सातारा.


छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे कुलदैवत असणाऱ्या माण तालुक्यातील दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव देवाची वार्षिक चैत्री यात्रा २३ मार्च ते २ एप्रिल अखेर होत आहे. या यात्रेतील मानाच्या कावडीचा मुख्य दिवस ३० मार्च आहे.या दिवशी भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय आस्थापना सज्ज झालेल्या पाहायला मिळत आहेत. सातारा पोलीस प्रशासनाने शिखर शिंगणापूर ते फलटण मार्गावरील वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.



पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. हे बदल ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ६:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत लागू राहतील.


वाहतुकीतील प्रमुख बदल


पर्यायी मार्ग: शिखर शिंगणापूरकडून फलटणकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक शिखर शिंगणापूर – दहिवडी – मोगराळे घाट – फलटण किंवा शिखर शिंगणापूर – नातेपुते – बरड – फलटण अशी वळवण्यात आली आहे.एकेरी मार्ग: शिखर शिंगणापूर – कोथळे – कर्णेवाडी – आंदरुड – फलटण या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे एकेरी करण्यात आली आहे.


पोलीस प्रशासनाचे आवाहन


यात्रेच्या मुख्य दिवशी शिखर शिंगणापूर ते फलटण मार्गावर पायी चालणारे भाविक आणि कावडींची मोठी संख्या असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय रोखण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे, तिथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व नागरिक, भाविक आणि वाहन चालकांनी या बदलांची नोंद घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.