ताज्या घडामोडी
Trending

दहिवडीत आज ‘मोफत महाआरोग्य शिबीर’ व ‘चष्मे वाटप’ सोहळ्याचे आयोजन

वृत्त दि. – १० एप्रिल २०२५

वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.

संपादक – चैतन्य नंदकुमार काशिद


    सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव, श्री सद्गुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट पुणे आणि सेवासदन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी आयडियल गणेश मंडळ,दहिवडी येथे मोफत महाआरोग्य शिबीर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


   या भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनिया गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत.


या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गंभीर आजारावरील आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. यात पुढील तपासण्या करण्यात येणार आहेत :

हृदयरोग तपासणी: ईसीजी, अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी.

युरोलॉजी: किडनी, प्रोस्टेट आणि मूत्राशयाचे आजार.

नेत्र तपासणी: डोळ्यांची तपासणी व गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप.

इतर: मणका व मेंदूचे आजार, मोफत कॅन्सर तपासणी आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया.

तसेच कान-नाक-घसा, फिजिओथेरपी, दंतरोग, स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञांकडूनही रुग्ण तपासणी केली जाणार आहे.


      याशिवाय मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे,अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, मोफत फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया,मोफत वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग,मधुमेह, उच्चदाब, मोफत हिप रिप्लेसमेंट या सर्व आजारांच्या तपासणी व उपचारासाठी नोंदणी सुरू आहे.

कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: शुक्रवार, १० एप्रिल २०२६

वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत

स्थळ: श्री स्वामी समर्थ मंदिर; आयडियल गणेश मंडळ, चावडी चौक, दहिवडी (ता. माण, जि. सातारा).



     या कार्यक्रमास दहिवडीच्या नगराध्यक्षा वर्षाराणी सावंत, उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले, माजी नगराध्यक्षा निलम जाधव, नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्यासह सर्व नगरसेवक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


दहिवडी परिसरातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवप्रसाद फाउंडेशन आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९५५२५९४९५० किंवा ९५५२५९४९४८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.